• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काताळे नवानगर उर्दू शाळेत म. गांधी जयंती

by Ganesh Dhanawade
October 6, 2023
in Guhagar
97 1
0
काताळे नवानगर उर्दू शाळेत म. गांधी जयंती
191
SHARES
547
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जि. प. शाळा काताळे नवानगर उर्दू येथे स्वच्छता मोहीम व महात्मा गांधी 152 वी व लालबहादूर शास्त्री 117 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. Gandhi Jayanti in Katale Urdu School

या कार्यक्रमाची सुरुवात हसन शिरगावकर याच्या कुराण पठाणाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जैद भाटकर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अशफाक कुपे यांनी केले. स्वच्छता मोहीममध्ये काताळे नवानगर ग्रामपंचायत सदस्य मधुकर असगोलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जैद भाटकर, पालक, मुख्याध्यापक अशफाक कुपे, उपशिक्षिका तह्मीना गुहागरकर, अंगणवाडी शिक्षिका फरीदा जांभारकर, दानिया गुहागरकर व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच पेटी उघडा गुणवत्ता वाढवा हा उपक्रम राबविण्यात आला.  Gandhi Jayanti in Katale Urdu School

स्वच्छता संदर्भात काताळे नवानगर ग्रामपंचायतचे सदस्य मधुकर असगोलकर यांनी आपले मत मांडले. स्वच्छता संदर्भात गावात प्रभाती फेरी काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक कुपे यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपशिक्षिका तहमिना गुहागरकर यांनीही मार्गदर्शन केले. मुलांमध्ये हुरबानू जांभारकर, सुमय्या जांभारकर यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जैद भाटकर यांनी स्वच्छता संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. Gandhi Jayanti in Katale Urdu School

Tags: Gandhi Jayanti in Katale Urdu SchoolGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.