स्वच्छता सेवक म्हणून गौरव
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम प्राचार्य श्री. व्ही.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकताच संपन्न झाला. जयंतीनिमित्त विद्यालयामध्ये माध्यमिक विभागातर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School
स्वच्छता अभियानांतर्गत शालेय परिसर स्वच्छता, निबंध स्पर्धा व विद्यार्थी – शिक्षक वकृत्व सादरीकरण तसेच ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे कर्मचारी यांचा स्वच्छता सेवक म्हणून गौरव असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे कर्मचारी हे नियमित स्वच्छता सेवा करण्याचे काम करीत असल्यामुळे स्वच्छता अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात ग्रामपंचायत कर्मचारी श्री.दीपक मोरे , श्री.सुरेश तेलगडे व श्री. भिकाजी गावडे यांचा स्वच्छता सेवक म्हणून प्राचार्य श्री.व्ही.डी. पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मान्यवर प्राचार्य व शिक्षकवृंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाध्यक्ष श्री.व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस. चव्हाण यांच्या हस्ते देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School
सदरच्या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून कार्यक्रमाध्यक्ष व प्राचार्य श्री.व्ही.डी.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस.चव्हाण, प्रा.श्री.एस. एस.मोरे, सौ.एस.एस.सुतार, प्रा. सौ.मोरे, श्री.आर.एम.तोडकरी, श्री.एस.एस.घाणेकर, सौ.सावंत – विचारे आदी मान्यवर व बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते. सदरच्या जयंती कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवर व शिक्षकवृंदांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School
राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयामध्ये माध्यमिक विभागातर्फे प्राथमिक व माध्यमिक या दोन गटात निबंध स्पर्धा संपन्न झाली होती. इयत्ता पाचवी ते सातवी या प्राथमिक गटासाठी ” माझा आवडता नेता महात्मा गांधी ” व ” लालबहादूर शास्त्री यांचे महान कार्य “ तसेच इयत्ता आठवी ते दहावी या माध्यमिक गटासाठी स्वच्छतेचे महत्व ” , ” महात्मा गांधी यांचे महान कार्य ” व ” लालबहादूर शास्त्री – महान व्यक्तिमत्व “ हे विषय देण्यात आले होते. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School
प्राथमिक गटात कु.कुशल वैभवकुमार पवार – इयत्ता पाचवी – प्रथम क्रमांक, कु.ओजस्वी सुधीर वासनिक – इयत्ता सातवी – द्वितीय क्रमांक , कु. श्रेया अनिल धुमक – इयत्ता सहावी – तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ म्हणून कु.प्रणदा जितेंद्र हातीसकर – इयत्ता सहावी व कु.आर्या अनंत जानवळकर – इयत्ता सातवी यांनी सुयश संपादन केले.
माध्यमिक गटात कु. श्रद्धा अनिल धुमक – इयत्ता आठवी – प्रथम क्रमांक, कु.समृद्धी सुरेश आंबेकर – इयत्ता आठवी – द्वितीय क्रमांक, कु. अर्पिता अनिल धामणस्कर – इयत्ता दहावी – तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ म्हणून कु. मानसी संदीप पालकर – आठवी व कु.संजना संतोष चव्हाण – इयत्ता दहावी यांनी सुयश संपादन केले. स्पर्धेतील सुयशस्वीतांना शैक्षणिक भेटवस्तू व गुलाबपुष्पाने तसेच सहभागी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पाने गौरविण्यात आले. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School
कु.कस्तुरी समीर वझे – इयत्ता सहावी, कु.ओजस्वी सुधीर वासनीक – इयत्ता सातवी, कु.हिंदवी ईश्वर घनवटे – इयत्ता सातवी, कु.समृद्धी सुरेश आंबेकर – इयत्ता आठवी, कु.मृण्मयी दत्ताराम जाधव – इयत्ता आठवी व कु.श्रेयशा सहदेव नरळे – इयत्ता नववी या विद्यार्थिनींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महान कार्य व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे देशासाठी लाभलेले योगदान आदी विषयांनुसार वकृत्व सादर केले. माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ सावंत – विचारे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची विचारसरणी , म. गांधींनी दिलेली शिकवण बापूंचे देश कार्य, लालबहादूर शास्त्रींची विचारधारा, देशप्रेम, राष्ट्रासाठी दिलेले योगदान, भारतीयांना दिलेला मंत्र आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले.
प्राचार्य श्री.व्ही.डी.पाटील यांनी निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वच्छता अभियानाचा हेतू , स्वच्छतेचे महत्व, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे महान कार्य, समाजसुधारकांच्या कार्यातून मिळणारा संदेश, स्वच्छतेची सवय आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.एस.एम.आंबेकर व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण यांनी केले. शिक्षक श्री.एस.एस.घाणेकर यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व विद्यार्थी तसेच निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी, वकृत्व सादर करणारे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School
