रत्नागिरी, ता. 30 : राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर कृषी समृध्दी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला 74 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी 17 कोटी 68 लाख निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. Funds to Ratnagiri district under Krishi Samrudhi Yojana

एकीकडे जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची मागणी केली जात आहे. अशा वेळी कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जिल्ह्यासाठी 17 कोटी 68 लाख निधी मंजुर झाला आहे. या योजनेसाठी दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जातेय. या योजनेचा उद्देश हा कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे आणि पिकांमध्ये विविधता आणणे, असा आहे. Funds to Ratnagiri district under Krishi Samrudhi Yojana
रत्नागिरी जिल्ह्याला यातील निधी मिळाल्यानंतर प्रत्येक कृषी सजातील सहाय्यक कृषी अधिकारी यांना जवळपास 50 लाखांचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनांसाठी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर या योजनेची माहिती मिळणार आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, त्यामध्ये ब्रशकटर, पॉवरटिलर, ट्रॅक्टर, फवारणी पंप मिळणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना या योजनांचा समावेश या योजनेत असणार आहे. Funds to Ratnagiri district under Krishi Samrudhi Yojana
