गुहागर, ता. 17 : रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याकडून गुहागर शहरातील विविध विकास कामे मंजूर झाली असून, साहिल आरेकर यांनी गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेताच पाठपुरावा करून खासदार तटकरे यांच्याकडून गुहागर शहराला विकास निधी मिळविला आहे. Funds for Guhagar city from MP Tatkare


खासदार सुनील तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांना बळ दिलं जात असून, आरेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याने गुहागर शहरासाठी 30 लाख रुपयांचा निधी विकास कामासाठी मंजूर केल्याची माहिती माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी दिली. यावेळी गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार तटकरे यांचे जाहीर आभार मानण्यात आले. Funds for Guhagar city from MP Tatkare