गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत असून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्यासाठी हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर एस.टी. बस उलटण्याची घटना घडली होती. सुदैवाने मोठा अपघात टळला, मात्र भविष्यात गंभीर दुर्घटना होऊ शकते, असा इशारा देत या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली होती. Funds approved for repair of Janwale road

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांना लेखी निवेदन सादर करून तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली होती. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. मनसेच्या या ठाम भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरने तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरचे उप अभियंता स्वप्निल पाटील, शाखा अभियंता रेणुका ओतारी यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील वार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून, सध्या तो तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीचे काम जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्तातात्काळ हाती घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांना दिली. Funds approved for repair of Janwale road
रस्ता दुरुस्तीचा प्रस्तावामध्ये जानवळे भडकंबा तळवली मुंढर (११४) मार्गाच्या दुरुस्तीकरिता २३ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे उपअभियंता यांनी ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांना सांगितले. तसेच, पुढील एक महिन्याच्या आत काम सुरू होईल, अशी खात्रीही यावेळी दिली आहे. Funds approved for repair of Janwale road
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, गाव अध्यक्ष कमलाकर वणगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश नर्बेकर, जानवळे मनसे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, उपशाखा अध्यक्ष प्रवीण लांजेकर, गट अध्यक्ष राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र इंदुलकर, विजय शिंदे, अंजली जांभळे, प्रीती जांभळे, चंद्रकला बैकर, दत्ताराम जांभळे, सुखदा तीवरेकर तसेच गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. Funds approved for repair of Janwale road