• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

by Mayuresh Patnakar
November 7, 2022
in Guhagar
19 0
0
साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

Fund the work of Sakhriagar JT

37
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मच्छीमार सोसायटीचे उद्योगमंत्री उदय सामंतांना साकडे

गुहागर, ता. 7 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2011 मध्ये मंजुर झालेल्या आणि 2012-13 मध्ये काम सुरु करण्याचे आदेश दिलेल्या साखरीआगर जेटीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 2015 मध्ये मत्स्य आयुक्तालयाने हे काम थांबवले. सदर आर.सी.सी. जेटीचे काम लवकरात लवकर सुरु करावे. अशी साकडे साखरीआगर हेदवी गट मच्छीमार सहकारी सोसायटीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना घातले आहे. Fund the work of Sakhriagar JT

साखरीआगर येथे मच्छीमार जेटी बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन राज्यमंत्री व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी 2011 मध्ये केंद्र सरकारकडून मंजुर करुन आणला होता. त्यावेळी साखरीआगर जेटीसाठी 2 कोटी 97 लाख रुपये खर्च होणार होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. अर्थसंकल्पात या कामाचा समावेश झाला. 2012 – 13 मध्ये पतन अभियंता रत्नागिरी यांनी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराला कार्यारंभाचा आदेशही दिला. सदर काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत 7 फेब्रुवारी 2014 ला संपत होती. तरीही मार्च 2015 पर्यंत हे काम सुरु होते. शासनाचा 16 लाख 25 हजाराचा निधी या कामावर खर्चही झाला. पण सीआरझेडची परवानगी नसल्याने हे काम थांबले. Fund the work of Sakhriagar JT

साखरीआगरच्या जेटीचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी साखरीआगरमधील मच्छीमारांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीचे वेळी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करु अशा शब्द दिला. म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात आला.  आमदार भास्कर जाधव यांनी निवडून आल्यावर पाठपुरावा सुरु केला. मात्र शासकीय यंत्रणा दाद देत नव्हत्या. त्यामुळे संतापलेल्या आमदार जाधव यांनी मार्च 2022 च्या अधिवेशनात साखरीआगर जेटीबाबत आक्रमक भुमिका घेतली.  यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख, मत्स्य व्यवसाय आयुक्त, अन्य अधिकारी, आमदार भास्कर जाधव आणि साखरी आगर हेदवी गट मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन मारुती होडेकर व अन्य पदाधिकारी यांची संयुक्त सभा बोलावली. या सभेमध्ये सदर जेटीच्या बांधकामासाठी सुधारीत दराने 8 कोटी 43 लाख रुपये मंजुर करण्यात आले. Fund the work of Sakhriagar JT

आता साखरीआगर जेटीच्या बांधकाम सुरु होण्यामध्ये कोणताच अडथळा नव्हता. परंतु त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय नाट्य घडले. सरकार बदलले. परिणामी साखरीआगर जेटीचे काम जैसे थे राहीले. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारने या कामाला गती देण्याची गरज आहे.  हे लक्षात घेवून मच्छीमार सोसायटीने राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. Fund the work of Sakhriagar JT

Tags: Fund the work of Sakhriagar JTGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.