विपुल कदम यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री उदय सामंत यांचे पाठबळ
गुहागर, ता. 2: तब्बल १३ वर्षांपासून रखडलेल्या गुहागर तालुक्यातील देवघर येथील तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांना यश आले आहे. बुधवारी (ता, 1) राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या आढाव्याची सभा घेतली. त्यावेळी विपूल कदम यांनी आढावा सभेत देवघरच्या क्रीडा संकुलाचा विषय मांडला. तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी देवघरच्या क्रीडा संकुलसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. Fund approved for Deoghar Sports Complex

गुहागर तालुक्यातील देवघर येथील तालुका क्रीडा संकुल बांधून अनेक वर्ष झाली. आमदार भास्कर जाधव राज्यमंत्री असताना तालुक्यासाठी देवघर येथे क्रीडा संकुल उभे करण्यासाठी निधी दिला होता. मात्र क्रीडा संकुल क्रीयान्वीत होण्यासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी वेळेत न मिळाल्याने क्रीडा संकुलाची इमारत विनावापर होती. शर्यतीसाठी बनवलेला मार्गाचे काम अपुरे होते. संकुलामध्ये आवश्यक क्रीडा साहित्य नव्हते. पाण्याची व्यवस्था मार्गी लागलेली नव्हती. गेल्या 10 वर्षात दुर्लक्षित क्रीडा संकुलाच्या इमारतीचे छप्पर गळू लागले. गवत वेलींनी क्रीडा संकुल घेरले गेले. दरम्यानच्या काळात क्रीडा संकुल वापर नसाल तर आमची जमीन आम्हाला परत द्या अशी मागणी होऊ लागली होती. Fund approved for Deoghar Sports Complex
विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान खेडमधील उद्योजक विपुल कदम राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटातर्फे गुहागर विधानसभा मतदारसंघात विपुल कदम यांचा प्रवास सुरु झाला. गणेशोत्सवाचे वेळी विधानसभा क्षेत्रात विपुल कदम यांच्या फलकांनी लक्ष वेधून घेतले होते. नवरात्र उत्सव काळात विपुल कदम यांनी विधानसभा क्षेत्रातील अनेक नवरात्र मंडळांना आर्थिक मदत केली. तेथेही विपुल कदमांचे नवरात्रीच्या शुभेच्छाचे फलक झळकले. त्याही पुढे जात गुहागर तालुक्यातील 2 हजार महिलांना नवदुर्गा दर्शन यात्रा घडविण्यासाठी विपुल कदम यांनी पुढाकार घेतला. या सर्वातून प्रतिमा निर्मितीचे काम करत असतानाच त्यांनी विकास कामांना मार्गी लावण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत. Fund approved for Deoghar Sports Complex

देवघर क्रीडा संकुलाची विनावापर असलेली इमारत लक्षात आल्यावर विपुल कदम यांनी या कामात लक्ष घातले. क्रीडा संकुलासंदर्भात नेमके काय केले पाहिजे यासाठी त्यांनी देवघरमधील माध्यमिक विद्यालयाचे संचालक, क्रीडा अधिकारी यांची भेट घेतली. क्रीडा संकुलाची पहाणी केली. जे विषय संपर्कातून, पाठपुरावा करुन सोडविणे होते ते मार्गी लावले. त्यानंतर बुधवारी झालेल्या आढावा सभेत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना या विषयाची संपूर्ण माहिती दिली. याच सभेत क्रीडा अधिकाऱ्यांनी केवळ इमारतीच्या डागडुजीसाठी तीन कोटीचा निधी आवश्यक असल्याचे सांगितले होते. मात्र विपुल कदम यांनी क्रीडा संकुल सुरु करायचे असेल तर क्रीडा साहित्य आणि अन्य व्यवस्थांच्या उभारणीसाठी आणखी निधीची मागणी केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत आढावा सभेत चर्चा करुन 5 कोटीचा निधी देवघरच्या क्रीडा संकुलासाठी मंजूर केला. Fund approved for Deoghar Sports Complex