पिंपळादेवी क्रीडा मंडळ वरचापाट आयोजित; उपविजेता संघ सेव्हन स्टार गुहागर
गुहागर, ता. 21 : मधील पिंपळादेवी क्रीडा मंडळ गुहागर वरचापाट आयोजित कै. आल्हाद तोडणकर व कै. रमेश भोसले स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचे श्रीदत्त मंदिर वरचापाट येथे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेत खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाने सेव्हन स्टार गुहागर संघावर मात करून अंतिम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत तालुक्यातील १७ संघांनी सहभाग घेतला होता. Friend circle winner in kabaddi competition


पिंपळादेवी क्रीडा मंडळाने श्रीदत्त मंदिर वरचापाट येथे आयोजित केलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेचे उ्घाटन आम. भास्कर जाधव व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. २०२२ फ्रेंड उत्तम नियोजन आणि कबड्डी पाहण्यासाठी महिलांसाठी खास गॅलरीची उभारणी करण्यात आली होती. सर्कल क्रीडा मंडळाने या मोसमात सलग ३ वेळा अंतिम फेरीत पोहचून २ वेळा विजेतेपद, तर एकदा उपविजेते पद प्राप्त केले आहे. Friend circle winner in kabaddi competition


अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार सुमित आरेकर (फ्रेंड सर्कल खालचापाट), उत्कृष्ट पकड शुभम पावसकर (फ्रेंड सर्कल खालचापाट), उत्कृष्ट चढाई प्रसाद भागडे (सेव्हन स्टार गुहागर) यांना चषक व शुज देवून गौरवण्यात आले. मालिकावीर म्हणून सोहम कनगुटकर (फ्रेंड सर्कल खालचापाट) याची निवड करण्यात आली. त्याला चषक व ब्रॅंडेड वॉच देऊन गौरविण्यात आले. तर विजेत्या संघास १० हजार रुपये, चषक आणि उपविजेत्या संघास ७ हजार व चषक देवून गौरवण्यात आले. Friend circle winner in kabaddi competition


स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक दीपक कनगुटकर, निलेश मोरे, प्रसाद कचरेकर, पराग मोरे, मनीष मोरे, दत्ता शेटे, विनायक बारटक्के, राकेश साखरकर, सनी तवसाळकर, संगम मोरे, मयुरेश कचरेकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचे समालोचन दीपक देवकर यांनी केले. Friend circle winner in kabaddi competition