शिवसेनेच्या बैठकीत निर्णय, टोलमाफीची करणार मागणी
Guhagar News 20 : गणेशोत्सवासाठी कोकणात (Free ST for Ganeshotsav) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 मोफत एसटी (Free ST) बसेस सोडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये चाकरमान्यांसाठी मोफत एसटी आणि टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात श्रावण महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम करण्याचेही ठरविण्यात आले आहे. याचे नियोजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात होणार आहे.
Free ST for Ganeshotsav
यंदा मंगळवार, 19 सप्टेंबरला गणपतीबाप्पांचे (Ganeshotsav) आगमन होत आहे. एक महिन्यांनी गणपती येणार असले तरी मुंबईकरांना कोकणात येण्याची तयारी (Travel) आत्ताच करावी लागते. यामध्ये मुख्यत: मुंबईतून कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातून मुंबईत परतण्यासाठी आरक्षणे (reservations) करणे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आयत्यावेळी रेल्वे, एस.टी. खासगी बसेस मध्ये उभे राहयला देखील जागा मिळत नाही. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेने (Shivsena) मुंबईतील चाकरमान्यांना खुष करण्याचा निर्णय घेतला आहे. (Free ST for Ganeshotsav)
शनिवारी (ता. 19) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde), शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar), मुंबईतील शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. श्रावण महिन्यातील मंगळागौर, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव हे सण (Festival) मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा निर्णय झाला. यासाठी मुंबईतील 36 मतदारसंघात मंगळगौरीचे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे या उत्सवांच्या दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे मुंबईमध्ये जनजागृती अभियानही राबविणार आहेत. याच बैठकीत गणेशोत्सवाला जाण्यासाठी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 एस.टी. मोफत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे नियोजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात मुंबईच्या विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व अन्य पदाधिकारी करणार आहेत. (Free ST for Ganeshotsav)
Toll exemption for Ganeshotsav
एस.टी.ने प्रवास करणाऱ्यांबरोबरच खासगी वाहनांनी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठी आहे. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मुंबईतून कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी (Toll exemption for Ganeshotsav) करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घ्यावा. संबंधित वाहनांना टोलमाफीचे पास पोलीस स्थानकातून मिळावेत. तसेच मुंबईबरोबरच वसई, विरार, पालघर, ठाणे, नवी मुंबईतील चाकरमान्यांनाही असे पास देण्याची व्यवस्था व्हावी. अशी विनंती शिवसेना राज्य सरकारला करणार आहे. (Free ST for Ganeshotsav)