उपचार / शस्त्रक्रियेसाठी मिळणार 50 टक्के सवलत
गुहागर, ता. 29 : परमपूज्य आई श्री कलावती देवी यांच्या सिध्दकला भजन मंडळ गुहागर वरचापाट, श्री दत्त प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट आणि लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 3 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीराचे Free Health Camp आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामार्फत उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये (Life Care Hospital) दाखल होणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलच्या बिलामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. (Free Health Camp)
Free Health Camp
गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदिर येथे रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 पर्यंत मोफत आरोग्य शिबीर (Free Health Camp) होणार आहे. या शिबीरामध्ये सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत स्त्री रोग तज्ञ डॉ. अंशुमन खोब्रागडे हे मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे कॅन्सरबद्दल मोफत तपासणी आणि मार्गदर्शनही आयोजकांनी उपलब्ध केले आहे. तज्ञ डॉक्टरांतर्फे विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. मोफत मोतीबिंदू तपासणी देखील करण्यात येणार आहे. योग्य आहाराबद्दल (Diet Planning) मार्गदर्शन केले जाणार आहे. आरोग्य तपासणीचे दरम्यान आवश्यकता भासल्यास ई.सी.जी., रक्तातील साखरेची तपासणी मोफत केली जाणार आहे. (Free Health Camp)
30 to 50 % Discount
शिबीरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या अधिक तपासणीसाठी एक्स रे, सी. टी. स्कॅन, ए स्कॅन व लॅब तपासणीची आवश्यकता भासली तर 30 टक्के सवलत मुल्यात ही तपासणी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अधिक उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी या शिबीरात सहभागी झालेल्या रुग्णांनी लाईफ केअर हॉस्पिटलची निवड केली तर हॉस्पिटलच्या बिलामध्ये 50 टक्के सवलतही दिली जाणार आहे. (Free Health Camp)
सिध्दकला भजनी मंडळ गुहागर वरचापाट, श्री दत्त प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट आणि लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण यांनी आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ गुहागर तालुकावासियांनी घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबीराची अधिक माहिती हवी असल्यास शशिकांत चव्हाण (9604020638), मंगेश (बापू) शेटे (9307165660), दर्शन देवकर (9689068416) आणि योगेश साखरकर (9405066523) यांच्याकडे संपर्क साधावा. (Free Health Camp)