महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी
गुहागर, ता.14 : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर. (Maharishi Parashuram College of Engineering) मधील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातील चार विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. विप्रो (wipro), Larsen and Toubro कंपनांच्या उपकंपन्या माइंडट्री, ऑटोनिक एनर्जी सिस्टीम या नामांकित कंपन्या आहेत. four students Seclected in a multinational companies


आय.टी. क्षेत्राशी संबंधीत असणाऱ्या विप्रो (wipro), Larsen and Toubro कंपनीची उपकंपनी माइंडट्री, ऑटोनिक एनर्जी सिस्टीम या कंपन्यांनी महाविद्यालयात मूलाखती घेतल्या. त्यासाठी एन.एल.टी.एच (N.L.T.H.) या देशपातळीवरील ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरी घेतली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली. four students Seclected in a multinational companies
यामध्ये कु. अनिकेत पवार याची विप्रो (wipro) कंपनीमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर या पदावर वार्षिक साडे तीन लाख पॅकेजवर निवड झाली. याचसोबत Larsen and Toubro कंपनीची उपकंपनी माइंडट्री या कंपनीत कु. पूर्वा हेमश्चंद्र मोरे व कु. रिया प्रकाश गुहागरकर यांची ज्युनिअर इंजिनिअर या पदावर निवड करण्यात आली. तसेच कु. सुप्रिया प्रमोद राणे हिची ऑटोनिक एनर्जी सिस्टीम या कंपनीत ग्रॅज्युट ट्रेनी या पदावर निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे कौतुक करण्यात येत आहे. four students Seclected in a multinational companies