• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अमंली पदार्थांची विक्री करणा-या चौघांना पकडले

by Ganesh Dhanawade
October 10, 2023
in Guhagar
285 3
1
Four arrested for selling narcotics
560
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संगमेश्वर पोलिसांची कारवाई; दोन जण असगोलीतील

गुहागर, ता. 10 : संगमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतमध्ये कसबा शास्त्रीपुल येथे चोरट्या पध्दतीने अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक श्री. सुरेश गावीत यांनी पोलीस स्टाफसह तात्काळ कसबा शास्त्रीपुल येथे जावून सापळा लावुन ४ आरोपीना मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसानी रंगेहात पकडले आहे. Four arrested for selling narcotics

आरोपी १) अजय राजेंद्र काणेकर, वय ३८ वर्षे, २) सौ. अक्षरा अजय काणेकर, वय ३६ वर्षे, दोघे रा. असगोली मधलीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, ३) मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी वय ५६ वर्षे, कसबा शास्त्रीपुल ता. संगमेश्वर, ४) कामील हसन मुल्ला, वय ४८ वर्षे, रा. डिंगणी, मोहल्ला ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी यांना पकडून त्यांचेकडून रु. ३,००,०००/- किंमतीचा चरस अंमली पदार्थ व मोटारसायकल असे एकूण रु. ३,४०,०००/- रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. Four arrested for selling narcotics

सदर आरोपी यांचेवर संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ८६/२०२३, अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), (ii) (A), २२ (ब), भा.दं.वि.क. ३४ अन्वये दिनांक ०९/१०/२०२३रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रत्नगिरी श्री. धनजंय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. विनीत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. गावीत, सपोफौ / ९२५ साळवी, सपोफौ /२४० कांबळे, पोहेकॉ/१४३० कामेरकर, पोहेकॉ/१४०२ जोयशी, पोहेकॉ/७०७ कोलगे, पोना/९०१बरगाले, पोना/१२७३ मनवल, मपोना/१५२५ धामणस्कर, पोकॉ/३९ आव्हाड, पोकॉ/१६२० रामपूरे, व मपोकॉ/१५७३ वसावे यांनी केलेली आहे. अधिक तपास पोनि/- श्री.गावीत करीत आहेत. Four arrested for selling narcotics

Tags: Four arrested for selling narcoticsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share224SendTweet140
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.