गुहागर, ता. 25 : येथील श्री देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर या शाळेच्या २०१३-१४ बॅच च्या ५ माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ५ संगणक भेट स्वरुपात दिले आहेत. दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी या संगणकांचा उद्घाटन व प्रदान सोहळा पार पडला. आणि त्याच वेळी शाळेकडून या माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. Former students gift computers to school

हृषिकेश प्रकाश भावे, प्रतिक सुरेश मर्दा, चिनार महेंद्र आरेकर, आशिष रमेश मर्दा, अखिलेश रवींद्र खरे या ५ माजी विद्यार्थ्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक वापराचे ज्ञान अवगत व्हायला नक्कीच मदत होणार आहे. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेच्या विकासाला उपयोगी होईल, अशी भेटवस्तू कृतज्ञतापूर्वक दिल्याबद्दल या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. Former students gift computers to school

या सत्कार सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे सर, शाळेच्या परिवेक्षका, हळदणकर मॅडम, श्री कृपाल परचुरे सर, सौ शिंदे मॅडम, सौ कनगुटकर मॅडम, सावंत मॅडम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Former students gift computers to school

