गुहागर, ता.03: तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहीरीत 1 जूनला रात्री बिबट्याचा बछडा पडला होता. वन विभागाने ग्रामस्थांच्या साह्याने पिंजऱ्याद्वारे दिड वर्षाच्या बछड्याची सुटका केली. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना दाखवून या बछड्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. Forest dept releases leopard calf

गुहागर तालुक्यातील तवसाळ बाबरवाडीतील सार्वजनिक विहीरीमध्ये बुधवारी (ता. 1 जून) रात्री बिबट्याचा बछडा (leopard calf) पडला होता. गुरुवारी सकाळी विहीरीच्या ढासळलेल्या भागात बछडा बसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती वन विभागापर्यंत (Forest dept) पोचवली. त्यानंतर गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, खेडचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, दत्ताराम सुर्वे पिंजरा घेवून घटनास्थळी पोचले. तेथील ग्रामस्थांच्या मदतीने या बछड्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले. सदर बछड्याचे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले. या बछड्याचे वय सुमारे दिड वर्ष होते. बछडा (leopard calf) जखमी, भुकेलेला नसल्याचे लक्षात आल्यावर पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या परवानगीने या बछड्याला वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. Forest dept releases leopard calf
यावेळी तवसाळचे सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह कमलेश कदम, दिपक कदम, नंदु कदम, निलेश कदम, मसुद्दीक कारभारी, विजय नाखरे, चंद्रकांत निवाते आदी ग्रामस्थ उपस्थित होते. Forest dept releases leopard calf
या संबंधिचा व्हिडिओ पहा