नगराध्यक्ष बेंडल, बाग चौपाटीवर होणार चहा, नाश्ताची सोय
गुहागर, ता. 14 : आर्थिक सक्षमतेकडे जात असतानाच पर्यटकांच्या चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था बाग (पाचमाड) चौपाटीवर (Food Stall on Beach) महिला बचत गट करत आहे. याचा फायदा पर्यटनवाढीसाठी (Tourism) होणार आहे. महिलांचा हा धाडसी उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले.
गुरुकृपा महिला बचत गटाला दिनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातून (DAY – NULM) बँक ऑफ इंडियाने 6 लाखाचे कर्ज मिळाले. या कर्जापैकी 1 लाख रुपये खर्च करुन ही हातगाडी महिला बचत गटाने बांधुन घेतली. गुहागर शहराच्या एका टोकाला असलेल्या पाचमाड चौपाटीवर (Pachmad Beach) वाहने लावण्यासाठी प्रशस्त जागा आहे. याच चौपाटीवरुन ॲगलिंग फिशिंग करणाऱ्या ठिकाणी जाता येते. त्यामुळे पाचमाड चौपाटीवरील वर्दळ वाढत आहे. हे लक्षात घेवून गुरुकृपा स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने पाचमाड चौपाटीवर (Pachmad Beach) वडापावची हातगाडी (Food Stall on Beach) सुरु केली. या हातगाडीचे उद्घाटन सोमवारी (ता. 14) नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले. Food Stall on Beach
यावेळी बेंडल म्हणाले की, गुहागर शहरामध्ये एकूण 48 महिला बचतगट आहे. सर्व गट क्रियाशिल असल्याने आणि आर्थिक शिस्त पाळत असल्याने बँकांकडून वित्तपुरवठ्यातही सातत्याने वाढ होत आहे. या वित्त पुरवठ्याच्या उपयोग करुन स्वविकासाबरोबर शहराचा विकास, रोजगार निर्मिती यासाठी महिलांकडून प्रयत्न होत आहेत. केवळ नगराध्यक्ष म्हणून नव्हे तर राजकारणातून सामाजिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून अशा वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या महिला बचतगटांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास मी तयार आहे. Food Stall on Beach
बचतगटांच्या समन्वयक सौ. आंबोकर म्हणाल्या की, गुहागर शहरात बचत गटांद्वारे काम करणाऱ्या महिलांची संख्या आज 4 हजार हून अधिक आहे. या बचतगटांची उत्पादने आता परदेशातही जावू लागली आहेत. यशस्वीतेकडे वाटचाल करणाऱ्या महिला बचतगटांना एकत्र करण्यासाठी, त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी आम्हाला 1 हजार स्क्वेअर फुटाच्या सभागृहाची आवश्यकता आहे. ही व्यवस्था नगरपंचायतीने करावी. Food Stall on Beach
नगरपंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी पेढांबकर व बँक ऑफ इंडियाच्या महिला बचत गट विभाग सांभाळणाऱ्या सौ. परचुरे यांनी गुरुकृपा स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेविका सुजाता बागकर, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीधर बागकर, गुरुकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. मनाली मंगेश मोरे, सेक्रेटरी वैभवी बागकर, मोहन बागकर, मुरलीधर बागकर, रमाकांत बागकर, सुहास बागकर, सुभाष मोरे, संजय बागकर, नवनाथ बागकर, मंगेश मोरे, रत्नाकर बागकर, यांच्यासह अन्य बचत गटाच्या महिला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. Food Stall on Beach
Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Food Stall on Beach, Tourism,