वरवेली शिंदेवाडीतील नमन लोककलेतील मृदुंगमणी
गुहागर, ता.02 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी येथील नमन कलाकार व मृदुंगमनी जगन्नाथ गणपत शिंदे यांना लोककला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार नमन लोक कला संस्था व साई श्रद्धा कला पथक, मुंबई कानसे ग्रुप आयोजित नमन जागर लोककलेचा सन्मान लोक कलावंताचा कार्यक्रमात देण्यात आला. माजी आ. डॉ. विनय नातू, नमन लोक कला संस्था अध्यक्ष रवींद्र मटकर यांच्या हस्ते देण्यात आला. मुंबई दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले येथे हा कार्यक्रम पार पडला. Folk Art Pride Award to Shinde

जगन्नाथ शिंदे हे नवतरुण नमन मंडळ खालची वाडी (शिंदेवाडी या मंडळाच्या) नमन लोककलेमध्ये लहानपणापासून विविध पात्रांचे काम करत आहेत. त्यांनी नमन कलेमध्ये श्रीकृष्ण राधा, पेंद्या, मावशी, गवळण, संकासुर तसेच वगनाट्यामध्ये मध्ये विविध पात्रे साकारली आहेत. सध्या ते या नमन मंडळामध्ये मृदुंगमणी म्हणून कला साकारत आहेत. त्यांनी त्यांचे चुलते कै. नारायण लक्ष्मण शिंदे यांच्या कडून नमन कलेचे ज्ञान प्राप्त केले. कोकणची लोककला हा कोकणचा श्वास आहे. परंतु हा श्वास रसिकाच्या मनामध्ये जपून ठेवण्याचे काम लोक कलाकार जगन्नाथ शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्याभर आपल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रसारित केली आहे. ही लोककला जोपासत जनप्रबोधन व समाज प्रबोधन त्यांनी केले. Folk Art Pride Award to Shinde
मुंबईत नमन लोककलावंतांचा गौरव संबंधित बातमी पाहण्यासाठी क्लिक करा.

