गुहागर, ता. 20 : गुहागर पोलिस परेड मैदानावर उभारण्यात आलेला ७५ फुटी ध्वजस्तंभ गेली दोन वर्षे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवीण्यासाठी मूहूर्ताचा शोध सुरू आहे. Flagpole in Guhagar Awaits Inauguration
गेल्या महिन्याभरापुर्वी उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा दौरा लागतो. मात्र ध्वजस्तंभाचा मंत्र्यांनाच विसर पडलेला पहावयास मिळत आहे. गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर शहराकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. कोणी मतदान मिळाले नाही तर कोणी गुहागरची नगरपंचायत आपल्या हातातून निसटली तर कोणी आम्हाला एकमापी सत्ता दिली नाही म्हणून. अशामध्ये शहराचे काय व्हायचे असेल ते होवो. असे सुर घुमत आहेत. Flagpole in Guhagar Awaits Inauguration

गेली दोन वर्षे गुहागर समुद्रचौपाटी लगत असलेल्या पोलिस परेड मैदानावर गुहागर महसुल इमारतीच्या शेजारी उभारण्यात आलेल्या ७५ फूट उंचीचा ध्वजस्तंभ राष्ट्रध्वज फडकण्यासाठी अजून किती वर्षे प्रतिक्षा करावी लागणार, असे बोलत आहे. या ध्वजस्तंभाला प्रकाशीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या दिव्यांचे ब्रॅकेट असता गंजू लागले आहेत. ध्वज फडकणारी साखळीही हळुहळु आपला पांढरा रंग गंजलेल्या लाल रंगात बदलत आहे. स्टीलनेही गंजलेल्या लाल रंगाची चादर घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गुहागरच्या या ध्वजस्तंभावर ध्वज फडकणार आहे का. असा सवाल तालुकावासीय करत आहेत. Flagpole in Guhagar Awaits Inauguration
१५ ऑगस्ट रोजीचाही मूहूर्त हुकला
१५ ऑगस्ट रोजी या ध्वजस्तंभाचे उदघाटन होईल असे वाटले होते. यासाठी चार दिवस अगोदर या ध्वजस्तंभाची डांगडूजी व स्वच्छता करण्यात आली. मात्र पालकमंत्री पुन्हा विसरले असे तालुकावासीयांना वाटत आहे. आता संविधान दिन हा मूहूर्त चांगला आहे. मात्र हा मुहूर्ततरी या ध्वजस्तंभाच्या उदघाटनासाठी फलदायी ठरतो का अशी शंका व्यक्त होत आहे. आपल्या देशाला स्वातंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून उभारलेल्या या ७५ फुट उंचीच्या ध्वजस्तंभासाठी अजून कीती वर्षे लागतील असे तालुकावासीय बोलत असून कुणीतरी सदर विषय पालकमंत्र्यांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. Flagpole in Guhagar Awaits Inauguration