गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत धोपावे-तेटले कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून सलग तीन दिवस उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात १३ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती. दर्शना महेंद्र पावसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १४ ऑगस्ट २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायत सदस्य श्रीमती. ऐश्वर्या युवराज जांभारकर यांना मिळाला. स्वातंत्र्य दिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष उपक्रम राबवण्यात आला. या दिवशी ध्वजारोहणाचा मान आपल्या गावातील दहावी आणि बारावी परीक्षेत सर्वोत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानुसार दहावीतील गुणवंत विद्यार्थी कु. पार्थ लवु नाटेकर व बारावीतील गुणवंत विद्यार्थीनी कु. मेहक अल्ताफ खान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. Flag hoisting ceremony at Dhopave-Tetale

या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक एकजूट या भावनांना अधोरेखित करणारे संदेश देण्यात आले. ग्रामपंचायत धोपावे-तेटलेत सलग तीन दिवस झालेले हे ध्वजारोहण सोहळे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. Flag hoisting ceremony at Dhopave-Tetale