गुहागर, ता. 20 : यंदा नेहमीच हमखास मिळणारी कोळंबी (मासे )मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या पाच वर्षांत डिझेलचे दरही दुप्पट वाढले आहेत. परंतू मच्छीचे मात्र तेच दर असल्याने मच्छीमार व्यवसायिक तोट्यात आले आहेत. Fishermen lose business
असगोलीचे सरपंच शंकर कटनाक यांनी सांगितले की, पाच वर्षापूर्वी डीझेल दर प्रती लिटर साठ रूपये होता. तेव्हा कोळंबी चा दर 200 ते 250 रूपये प्रती किलो होता. आता डीझेल दर 120 चे आसपास असून कोळंबीचा दर मात्र तोच आहे. कोळंबी मिळण्याचे प्रमाण ही कमी असल्याने अनेकदा मच्छीमारीला गेल्यावर डीझेलचेही पैसे सुटत नसल्याने मच्छीचा अंदाज घेवूनच मासेमारीसाठी जातो. Fishermen lose business
गेल्या पाच वर्षा पूर्वी असगोली येथें सहा सिलिंडर मच्छीमार टॅलर सुमारे 35 ते 40 होते. पण फयान वादळात सहा टॅलरना जलसमाधी मिळाली. तर काही जुने झाले आहेत. काहींनी विकले. आतां असगोली गावात फक्त सातच टॅलर असुन कमी मच्छीमुळे यातील फक्त तीनच टॅलर मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. जर एक टॅलर मासेमारीसाठी गेल्यावर 12 तासांसाठी बारा हजार रूपयाचा (12000/_) डिझेल लागतो व इतर खर्च तीन हजार रूपये येतो, असे पंधरा हजार रूपये खर्च होतो. यात टॅलर वरील तांडेलसह सहा खलाशाचा पगार वेगळा काढला जातो. Fishermen lose business
मच्छी मिळण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने टॅलरही कमी झाले आहेत. यामुळे असगोली येथील ताडेल, खलाशी नोकरी साठी बाहेर जात आहेत. तसेच पुर्वी एक सिलेडर व दोन सिलेडर मच्छीमार होडया पाच वर्षापूर्वी 15 ते 20 होत्या. परंतू आता याचे प्रमाण वाढले आहे. आतां असगोली येथें एक व दोन सिलेडर मच्छीमार होडया 50 च्या आसपास आहे. या होडया सकाळी मच्छीमारीला जातात व दुपारी येतात. यावरच अनेकांचा उदरनिर्वाह सुरू आहे. यानाही मच्छी मिळण्याचे प्रमाण कमी झोले आहे. Fishermen lose business