गुहागर, दि.08 : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात दि. 5 मार्च 2022 रोजी मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ या विषयावर एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग आयोजित या कार्यशाळमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अतिका राजवाडकर तसेच रत्नागिरी उप परिसरातील प्रा. तौफिन पठाण संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. यांनी खवय्यांचा मत्स्य पदार्थांकडे असणारा कल व मत्स्य पदार्थाना असलेली प्रचंड मागणी, परिणामी याच क्षेत्रातील उत्तरोत्तर वाढणारी संधी या बद्दल विवेचन केले. Fish Substance Workshop


मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ म्हणजे काय ? माशांचे मुल्यवर्धन कशाप्रकारे केले जाऊ शकते या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले. कमी किमतीचे आणि स्थानिक मच्छी बाजार तसेच जेट्टी वर सहज उपलब्ध असणाऱ्या माशांपासून चविष्ट व पोषण तत्त्वानी समृध्द मूल्यवर्धित मत्स्य पदार्थांची किंमत वाढते. अशा पदार्थाना बाजारामध्ये खूप मागणी असल्यामुळे या क्षेत्रातील रोजगारासाठी ही महत्त्वाची संधी ठरते. स्थानिक तसेच जागतिक बाजापेठेतही नाविन्यपूर्ण मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ आणल्यास स्थानिक तसेच जागतिक पातळीवर देखील हॉटेल चालक, खानावळी आणि इतर सबंधित व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो असे त्या म्हणाल्या. Fish Substance Workshop


सदर कार्यशाळेत कोटेड प्राँस, फिश कटलेट, फिश वेफर्स, जवळा चटणी, प्राँस सूप, फिश बॉल्स, प्राँस पिकल बनवण्याचे प्रात्यक्षिक संसाधन व्यक्तींनी दाखवले. विद्यार्थ्यांनी पदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेत मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. Fish Substance Workshop


या कार्यशाळेच्या आयोजनासाठी रत्नागिरी उप परिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर आणि सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरगावे यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता. Fish Substance Workshop

