गुहागर पोलीसांनी राजस्थानमध्ये पकडला आरोपी
गुहागर, ता. 14 : First time success in Cyber Crime येथील पोलीसांनी राजस्थानमध्ये जावून सायबर क्राईम गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांना सायबर गुन्ह्यात प्रथमच आरोपीपर्यंत पोचण्यात यश आले. त्यामुळे गुहागर पोलीसांचे वरिष्ठांकडून कौतूक होत आहे.
कशी झाली फसवणूक
गुहागर तालुक्यातील सॉफ्टवेअर इंजिनियअर असलेल्या एका महिलेला फेब्रुवारी 2022 मध्ये दिल्लीतून फोन आला. आपल्या आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड वर क्रेडीट सिक्युरिटी प्लॅन क्रियाशिल झाला आहे. त्यामुळे दरमहा आपल्याला 2400 रु. भरावे लागतील. हा प्लॅन रद्द करायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्डचा १६ अंकी क्रमांक द्या. सदर महिलेने क्रेडिट कार्ड क्रमांक सांगितल्यावर आणखी बोलण्यात गुंगवून या व्यक्तीने महिलेकडून व्ही व्ही क्रमांक व ओटीपी देखील मागून घेतला. ओटीपी मिळाल्यावर अवघ्या दहा मिनिटांनी या महिलेल्या खात्यातून 79 हजार 992 रुपये दिल्लीमधील दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले. त्यावेळी आपण फसविले गेल्याची जाणिव या महिलेला झाली.
First time success in Cyber Crime
14 फेब्रुवारी 2022 ला सदर महिलेने याबाबतची तक्रार गुहागर (Guhagar Police) पोलीसांकडे केली होती. माहिती तंत्रज्ञान कायदा व फसवणुकीच्या कलमांखाली पोलीसांनी गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर मा.पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या देखरेखाली सहा. पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, पोलीस हवालदार हनुमंत नलावडे, पोलीस नाईक राजेश धनावडे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ तसेच तांत्रिक विश्लेषण (TAB) पथकाचे पोलीस हवालदार रमिझ शेख यांची टीम तयार केली.
गुन्ह्यामधील पैसे एका बँक खात्यात जमा झाल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्या दिशेने तपास केल्यावर पोलीस यातील एक लाभार्थी बँक खाते हे विशाल सिंग राजेंद्र सिंह शेखावत, रा. जयपूर बेंनार रोड जिल्हा जयपूर राज्य राजस्थान याचे असल्याचे कळले. विशालसिंगने हे सर्व व्यवहार पटपटगंज दिल्लीतून केले होते. त्याचे बँक खाते हे मर्चंट सर्व्हिस मध्ये लिंक होते. गुहागर पोलीसांचे पथकाने राजस्थान गाठले. तेथील पोलीसांच्या साह्याने पाळत ठेवून अखेर विशालसिंगला अटक केली.
काय केले विशालसींगने
आरोपी विशाल सिंग याने हाउसिंग डॉट कॉम ही बनावट लिंक तयार केली. ही बनावट लिंक फर्स्ट डाटा या मर्चंट सर्व्हीस खात्याशी जोडली. फसवणूक केलेल्या व्यक्तीचे पैसे मर्चंट सर्व्हिस लिंक द्वारे हाऊसिंग डॉट कॉम या बनावट खात्यात जमा होत. पुढच्या काही मिनिटात आरोपी ही रक्कम आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करत असे. याच पध्दतीने संबधित महिलेच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर केले गेले. पुढे ही रक्कम दिल्ली येथील एटीएम द्वारे काढून घेण्यात आली. असे विशाल सिंगची चौकशी केल्यानंतर समोर आले आहे. विशालसींगचा या गुन्हात सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी 14 सप्टेंबरला त्याला अटक केली. आज विशालला न्यायालयाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीची सजा सुनावली आहे. First time success in Cyber Crime
पोलीसांचे यश कौतुकास्पद
आजपर्यंत झालेल्या अनेक सायबर क्राईममध्ये पोलीसांना गुन्हेगारापर्यंत पोचणे अवघड बनले होते. मात्र या केसमध्ये पोलीसांनी अनेक व्यवहारांचा बारकाईने अभ्यास केला. त्यामुळेच पोलीसांच्या पथकाला सायबर क्राईममध्ये प्रथमच आरोपीपर्यंत पोचण्यात यश आले आहे. First time success in Cyber Crime त्याबद्दल पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
अजुनही तपास बाकी अजुनही गुन्ह्याचा तपास संपलेला नाही. या गुन्ह्यात आणखी किती लोक आहेत त्याची माहिती घेवून त्यांनाही ताब्यात घ्यायचे आहे. रक्कमेची वसुली करायची आहे. प्राथमिक तपासाला यश आले आहे. असे सहा. पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी गुहागर न्यूजला सांगितले. या प्रकरणाचा तपास खोलात जावून केला तर आणखी काही फसवणुकीचे गुन्हे समोर येतील असा पोलीसांचा अंदाज आहे. त्याचबरोबर संबंधितांकडून रक्कमेची वसुली करणे हे देखील पोलीसांसमोर आव्हान आहे. First time success in Cyber Crime