• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कथा कथन स्पर्धेत असित सुर्वे प्रथम

by Guhagar News
September 26, 2023
in Ratnagiri
86 1
0
First in Asit Surve Katha Narration Competition
169
SHARES
483
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामिण भागातील विद्यार्थ्याची यशस्वी घौडदौड

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून आंतरशालेय कथाकथन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कै.ल.ग पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थी कु. असित संतोष सुर्वे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्याची यशस्वी घौडदौड फळाला आली आहे. First in Asit Surve Katha Narration Competition

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित, प्रोत्साहित करण्याकरिता दरवर्षी विविध कलाक्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांना घडवले जात आहे. यावेळी आंतरशालेय विविधांगी स्पर्धांपैकी ऐतिहासिक कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. या कथाकथन स्पर्धेत इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेला कु. असित  संतोष सुर्वे याने शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर भाष्य करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यासाठी त्याला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवून पारितोषिकाने सन्मानित केले. सदर पारितोषिक संस्थेचे कार्यवाह सन्मा. सतीश शेवडे व कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पा पटवर्धन तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. First in Asit Surve Katha Narration Competition

कु असित सुर्वे याचे गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे हे गाव असून तो जि.प. प्राथमिक केंद्रशाळा, चिंद्रवळे या शाळेचे सुपरिचित सेवानिवृत्त मुख्याध्यापक (स्मृतीशेष) हरिश्चंद्र सुर्वे आणि निवृत्त अंगणवाडी सेविका श्रीमती शैलजा सुर्वे यांचा तो नातू आहे. तर दापोली येथे प्राथमिक शिक्षक श्री अनिलकुमार सुर्वे हे त्यांचे मोठे चुलते आहेत. एकंदरीत शैक्षणिक वारसा लाभलेला कु. असित सुर्वे हा कुटुंबासमवेत शाळेतला हुशार व लाडका विद्यार्थी आहे. त्याला खेळाबरोबर वाचनाची खूप आवड आहे. कु.असित  सुर्वे याचे वडील सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे कार्यरत असून, आई गृहिणी आहे. आईला वाचनाचा व्यासंग असल्यामुळे कु‌. असित येथे पर्यंत पोहचला आहे. त्याला अनेक पारितोषिकाने सन्मानित केलेले आहे. First in Asit Surve Katha Narration Competition

कु.असित सुर्वे याचे मोठे मामा अर्थात मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीमंच, खेरशेत ( चिपळूण) या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी प्रत्यक्ष दूरध्वनी वरून संपर्क  साधून कौतुक केले. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. विशेष शाळेतील सर्व शिक्षकांनी, स्थानिक रहिवाशांनी आणि सर्व स्तरावरील ज्येष्ठश्रेष्ठां मार्फत कौतुकांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. First in Asit Surve Katha Narration Competition

Tags: First in Asit Surve Katha Narration CompetitionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet42
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.