ग्रामस्थ व सीआयएसएफच्या जवानांनी केले आगीवर नियंत्रण
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी परिसरातील दगड खाणीच्या बाजूला असलेल्या रांजाणे बाऊल भागामध्ये रविवारी दुपारी दोन च्या आसपास अचानकपणे वणवा लागला. विवेक पवार यांच्या चिरेखाणीवरील व्यवस्थापक सुरेश गोरीवले यांना प्रथम दर्शनी आग लागल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी त्वरित आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु दुपारी वारा जास्त असल्याने वणवा जास्त वेगाने वाढू लागला. वनवा लागल्याची माहिती तात्काळ गावचे सरपंच व पोलीस पाटील यांना देण्यात आली. Fire in forest area of Varveli

पोलीस पाटील सुजित शिंदे यांनी तात्काळ याची माहिती गुहागर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ रत्नागिरी गॅस अँड पावर कंपनीकडे संपर्क साधून फायर ब्रिगेड ची गाडी पाठवून देण्याची विनंती केली. काही तासातच फायर ब्रिगेड ची गाडी घटनास्थळी पोहोचली. परंतु ज्या परिसरामध्ये वणवा लागला होता त्या परिसरापर्यंत गाडी जाऊ शकत नव्हती. तरीदेखील रत्नागिरी गॅस अँड पावर कंपनी मधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाच्या जवानानेनी तात्काळ आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. व आग आटोक्यात आणली. नाहीतर भर दुपारी लागलेल्या आगीमुळे त्या परिसरातील फळझाडांचे देखील अतोनात नुकसान झाले असते. Fire in forest area of Varveli

यावेळी गावचे सरपंच नारायण आगरे, पोलीस पाटील सुजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, कोतवाल पंकज आगरे, ग्रामस्थ सुरेश गोरीवले उपस्थित होते. त्याचप्रमाणे भर दुपारी या भागामध्ये आग कशी लागली…. कोणी लावली याबाबत अद्यापही माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु या आगीमुळे शेतकऱ्यांच्या फळझाडे तसेच शेतीसाठी असलेल्या गवताचे नुकसान झाले आहे. या आगीवर वेळीच नियंत्रण झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. Fire in forest area of Varveli
