विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा आबलोली आयोजित
आबलोली, दि. 02 : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा आबलोली (ता.गुहागर) यांच्या वतीने भातगाव (गोळेवाडी) येथे आर्थिक साक्षरता शिबिर घेण्यात आले. यावेळी आबलोली शाखा व्यवस्थापक शैलेश शेळके यांनी उपस्थित बँक ग्राहकांना बँकेच्या विविध शासकीय योजना, बचत योजना याविषयी माहिती दिली. Financial Literacy Camp at Bhatgaon

या शिबिरासाठी बँक मित्र दिपक गुरव, बचत गटाच्या सी आर पी करमरकर, गोळेवाडी सरपंच रेणुका आग्रे, शिक्षक संजय आखाडे यांसह बचत गटातील महिला उपस्थीत होत्या. यावेळी भातगाव (गोळेवाडी) गावातील कै.रुक्मिणी कृष्णा आग्रे (वय-४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांचा बँकेत प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत विमा काढण्यात आला होता. त्याअंतर्गत वारस अभिजित कृष्णा आग्रे यांना विम्याची रक्कम २०००००/- (दोन लाख) त्यांच्या बचत खात्यात जमा झाल्याचे पत्र शाखा व्यवस्थापक शैलेश शेळके यांच्या हस्ते मृताच्या वारसास देण्यात आले. यावेळी दीपक गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले. Financial Literacy Camp at Bhatgaon

