सिंधुरत्न कलावंत मंचची स्थापना; ९ ते १४ मे या कालावधीत होणार महोत्सव
गुहागर, ता. 29 : जागतिक पातळीवर कोकणचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदी मंडळी एकत्र येत ‘सिंधुरत्न कलावंत मंच’या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हा महोत्सव रंगणार आहे. Film Festival in Konkan


या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहोचविण्यासोबत इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी सांगितले. Film Festival in Konkan
या महोत्सवात चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गज कलावंतांचा सन्मान केला जाणार आहे. या निमित्ताने या दिग्गचे आशीर्वादरूपी पाठबळ या महोत्सवाला लाभातील व आमच्यासाठी ते प्रेरणादायी असतील असं सांगत लेखक-दिग्दर्शक विजय राणे यांनी हा महोत्सव कलासृष्टीला वेगळ वळण देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला Film Festival in Konkan
या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ९ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता वीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे होईल. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री उदय सामंत या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे सलग ४ दिवस रोज तीन चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जातील. या चार दिवसांत अंदाजे २५ ते ३० हजार प्रेक्षक हजर रहातील. Film Festival in Konkan


सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या ८ तालुक्यात ४ दिवस दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आलेले १४ चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जातील. दिनांक १२ मे रोजी वेंगुर्ले येथे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. त्रपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्गात मामा वरेरकर नाट्यगृहात १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. Film Festival in Konkan