गुहागर, ता. 19 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा करण्य़ात आला. हा सोहळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. कांबळे, पर्यवेक्षक श्री. गंगावणे, पालक श्री. पवार, श्री. ओक, सौ. इमडे, विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. Felicitation of scholarship holder students


कुमार श्रेयश दत्तात्रय इमडे हा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 90 वा, कुमार वेद प्रदीप पवार हा उच्च प्राथमिक गटात जिल्ह्यात 25 वा व नेत्राली निखिल ओक हिने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 61 वा क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाळेने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. Felicitation of scholarship holder students


शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री गंगावणे सर, सावंत मॅडम, सौ तांबट- कांबळे मॅडम, सौ. कनगुटकर मॅडम, श्री मोहिते सर, सौ ठाकूर मॅडम, श्री ढोणे सर, सौ बाणे मॅडम, श्री कतकर सर यांचाही पुष्प देऊन शाळेमार्फत सन्मान करण्यात आला. यावेळी पालक पवार सर,ओक सर, इमडे मॅडम त्याचबरोबर नेत्राली ओक या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तांबट-कांबळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. ठाकूर मॅडम यांनी केले. Felicitation of scholarship holder students