बंधारा बांधण्याची ग्रामस्थांची मागणी
गुहागर, ता. 08 : शहरातील वरचापाट स्मशान भूमी ते खाडीच्या मुखापर्यंत असलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावरील २० वर्षापुर्वीची सुरु लागवड झाडांची उधाणच्या लाटेच्या फटक्याने पडझड झाली आहे. गुहागर नगरोत्थान योजनेतून ६ लाख रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेली गणपती विसर्जन पाखाडी पुर्णंता उध्दवस्त झाली असल्याचे विदाकर चित्र समुद्रकिनारी निर्माण झाले आहे. यामुळे वरचापाट येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. Fall of suru trees at Guhagar Varchapat


रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर कंपनीच्या जेटीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या बॅक वॉटरवॉल मुळे समुद्राच्या लाटेचा प्रवाह बदलला असून याचा मोठा फटका हा आता गुहागरच्या समुद्रकिनारी जाणवू लागला आहे. त्यातच होणारा छुपा वाळु उपसा ही याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. गुहागर समुद्रकिनारी असलेल्या सुरुबनाला या लाटयांनी २० वर्षापुर्वीपासूनची असलेली लागवड गिलंकृत करुन टाकली असून समुद्र लाटांचे पाणी आता माडांच्या बागांमध्ये शिरु लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समुद्रावर जाण्याची वाट बंद झाली आहे. Fall of suru trees at Guhagar Varchapat


याबाबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर, महिला आघाडी अध्यक्षा अपुर्वा बारगोडे यांच्यासह शहराध्यक्ष नरेश पवार, सरचिटणिस संतोष सांगळे, शहर अध्यक्षा स्मिता जांगळी, सरचिटणिस प्रांजली कचरेकर, माजी नगरसेवक उमेश भोसले, गजानन वेल्हाळ, जिल्हायुवा उपाध्यक्ष संगम मोरे, मंगेश रांगळे, ग्रामस्थ प्रशांत कचरेकर, शशिकांत नरवणकर आदि ग्रामस्थांनी या घटनेची पाहणी केली. Fall of suru trees at Guhagar Varchapat


यावेळी वरचापाट स्मशानभुमी ते खाडीच्या मुखापर्यंत तात्काळ बांधारा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्याकडे केली आहे. तरी आपण या विषयी तात्काळ पत्रव्यवहार करुन हा बांधरा बांधण्यासाठी प्रयन्न करणार असल्याने त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले. Fall of suru trees at Guhagar Varchapat