खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे उपक्रम
गुहागर, ता.12 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) ‘मायक्राँन’ (micron) धाग्यापासून वस्तू निर्मिती प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप समारंभ संपन्न झाला. हा उपक्रम महिला विकास कक्षातर्फे घेण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्रा.विराज महाजन, प्रशिक्षिका सौ.आरती जाधव व महिला विकास कक्षाच्या समन्वयक सौ.रश्मी आडेकर उपस्थित होत्या. Fabrication of items from ‘micron’ yarn
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ.आडेकर यांनी महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी असणाऱ्या अंतर्गत तक्रार समिती व महिला विकास कक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. महिला सक्षमीकरण तसेच विद्यार्थिनीमध्ये असलेल्या सुप्त गुणांच्या प्रकटी करणासाठी दिनांक १९ सप्टेंबर,२०२२ ते ८ ऑक्टोबर,२०२२ या १५ दिवस चाललेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. यानंतर वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या कु.जागृती विलास जाधव व कु. राखी शेखर रोहिलकर यांनी आपले अनुभव कथन केले. व अशा प्रकारच्या कौशल्यावर आधारित कोर्सचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. Fabrication of items from ‘micron’ yarn
प्रशिक्षका सौ.आरती जाधव यांनी विद्यार्थीनीना शुभेच्छा देऊन त्यांनी तयार केलेल्या वस्तूमध्ये अजून सर्जनशीलतेचा वापर करण्याविषयीचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.विराज महाजन यांनी विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्वाला आकार देण्याचे छंद जोपासावेत. त्यातून नवनिर्मिती दाखवून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात विद्यार्थीनिनी कौशल्या बरोबरच सादरीकरणाचे तंत्रही आत्मसात करावे. आपल्या व्यक्तिमत्वातील ‘स्व’ ओळखून समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करावे असे मत मांडले. महाविद्यालयात लवकरच कौशल्यावर आधारित कोर्स सुरु करण्याचा मानस व्यक्त केला. Fabrication of items from ‘micron’ yarn
यानंतर कु.दिप्ती महाजन हिने आभार प्रदर्शन केले. विद्यार्थिनीनी मायक्राँमनच्या धाग्यापासून तयार केलेल्या की-चेन भेटवस्तू म्हणून महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देण्यात आल्या. विद्यार्थिनीनी तयार केलेल्या सर्व वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचा लाभ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला. Fabrication of items from ‘micron’ yarn