• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सदानंद आरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

by Guhagar News
May 25, 2022
in Guhagar
16 0
0
Eye check-up camp at Guhagar
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : भंडारी समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व , गुहागरचे माजी सभापती आदरणीय स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांचा स्मृतिदिन नूकताच पार पडला. त्यानिमित्त गुहागर तालुका भंडारी समाजाने मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजीत केले होते. या शिबिरात तालुक्यातील जवळपास 100 लोकांनी नेत्र तपासणी केली. Eye check-up camp at Guhagar

स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांचा स्मृतिदिन 23 मे रोजी पार पडला. यानिमित्त कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, भंडारी भवन गुहागर येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भंडारी समाजातील जेष्ठ व्यक्ती खोत श्री. मोहन बागकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.  स्व.सदानंद गोविंद आरेकर साहेब यांच्या प्रतिमेला भंडारी समाज संघटनेचे सेक्रेटरी निलेश मोरे आणि गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक दिपक कनगुटकर यांनी पुष्पहार घातला. उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. Eye check-up camp at Guhagar

त्यानंतर मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला सुरूवात झाली. तालुक्यातील जवळपास 100 लोकांनी नेत्र तपासणी केली. त्यापैकी जवळपास 40 ते 50 लोकांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नेत्र तपासणीसाठी नँब हॉस्पिटल कार्यकारी संचालक श्री. नलावडे सर, डॉ. दिनेश जोशी आणि त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. Eye check-up camp at Guhagar

Eye check-up camp at Guhagar

यावेळी भंडारी समाज सेक्रेटरी मा.श्री. निलेश मोरे, खोत श्री. मोहन बागकर, युवा अध्यक्ष श्री. सचिन जाधव, भंडारी समाज महिला अध्यक्ष सौ. मानसी शेटे, श्री. दीपक कणगुटकर, श्री. श्रीधर बागकर, श्री. पद्माकर आरेकर, श्री. सागर मोरे,  श्री.हेमचंद्र आरेकर, श्री.आबा वरा डकर, श्री. नितीन गोयथळे, श्री. साहिल आरेकर, श्री. प्रसन्न कणगुटकर, निलेश गोयथळे, किर, राजेश आरेकर, अंकुश विखारे, प्रेम सुर्वे, ऋषिकेश जाधव, पवन गायकवाड, व्याडेश्वर गुहागरकर, शुभम शेटे, आकांक्षा आरेकर, संकल्प वराडकर, वेदांत पडवळ  आदी उपस्थित होते. Eye check-up camp at Guhagar

Tags: Eye check-up camp at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.