सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त १६ जुलैला धामणसे येथे आयोजन
रत्नागिरी, ता. 14 : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त १६ जुलै रोजी समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येत आहे. या दिवशी अहमदाबादच्या जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनलच्या सहकार्याने आणि नंदादीप नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. प्रथम येणाऱ्या १५० लोकांना वाचनासाठी मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. हे शिबिर स्व. डी. एम. जोशी सभागृहात सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत होणार आहे. Eye check-up and tree distribution by Ratneshwar Library


दुसरा उपक्रम एक झाड आईच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी हे वृक्षवाटप करण्यात येणार आहे. यात काजू, बेल, चिंच, आवळा, सोनचाफा, पेरू, खैर, साग व कडूनिंब या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ग्रंथालयाच्या प्रांगणात धामणसे येथे सकाळी ११ वाजता होईल. Eye check-up and tree distribution by Ratneshwar Library


नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन धामणसे गावचे सरपंच अमर रहाटे यांच्या हस्ते व एक झाड आईच्या नावे या उपक्रमात वृक्ष वाटप श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद जोशी, संचालक व उपसरपंच अनंत जाधव, विश्वास धनावडे, प्रशांत रहाटे व सौ. स्मिता कुळकर्णी उपस्थित राहणार आहेत. ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे यांनी हितचिंतक, वाचन प्रेमी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. Eye check-up and tree distribution by Ratneshwar Library