• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रधानमंत्री पीक विमा नोंदणीसाठी ३१ जुलै पर्यंत मुदत

by Guhagar News
July 23, 2025
in Guhagar
100 1
0
Extension for crop insurance registration
197
SHARES
563
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ साठी नोंदणी सुरू झाली असून, याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई (ईमेल: pikvima@aicofindia.com) ही पीक विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. तरी गुहागर तालुक्यातील शेतकरी यांनी भात आणि नागली या अधिसूचित पिकांसाठी विमा संरक्षण मिळवू शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जुलै पर्यंत या प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन  गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे यांनी केले आहे. Extension for crop insurance registration

भात पिकाकरिता प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ६१०००/असून याकरिता शेतकरी विमा हप्ता रक्कम ४५७.५० रुपये आहे. तसेच नाचणी पिकाकरिता प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३५०००/असून याकरिता शेतकरी विमा हप्ता रक्कम ८७.५० रुपये आहे. पीक विमा अर्ज करण्यासाठी फार्मर आयडी (एग्रीस्टॅक क्रमांक), पीक नोंद असलेला ७/१२ उतारा, आधारकार्ड प्रत, बँक पासबुक प्रत, पेरणी स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे आवश्यक  आहेत. Extension for crop insurance registration

पीक विमा अर्ज नोंदणी कशी कराल?

* आपले सरकार सुविधा महा ई-सेवा केंद्र (CSC)
 * नजीकच्या राष्ट्रीय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा खाजगी बँकेच्या शाखांमध्ये
* http://pmfby.gov.in या अधिकृत लिंकवर स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकता.

कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी ३१ जुलै २०२५ पूर्वीच आपला पीक विमा भरून घ्यावा. पीक विमा संदर्भात काही अडचणी उद्भवल्यास, शेतकरी बांधवांनी संबंधित गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी, गुहागर यांच्याशी संपर्क साधावा, असे जाहिर आवाहन गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी केले आहे. Extension for crop insurance registration

Tags: Extension for crop insurance registrationGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet49
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.