रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी ग्राहक पेठने खास महिला दिनानिमित्त प्रदर्शन व विक्रीची घोषणा केली आहे. शुक्रवार दि. ६ मार्च ते सोमवार दि. ९ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. Exhibition by Ratnagiri Consumer Centre

रत्नागिरी ग्राहक पेठच्या माध्यमातून संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या प्राचीताई शिंदे यांनी आजपर्यंत अनेक महिला उद्योगिनींना व्यवसायात उभे राहण्याकरिता मदत केली आहे. महिला बचत गटांनाही त्या नेहमीच सहकार्य करत आहेत. दरवर्षी महिला दिन, दिवाळी सणामध्ये रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे प्रदर्शन भरवण्यात येते. उदयोन्मुख उद्योगिनींना व्यवसायाची सुवर्णसंधी देणाऱ्या रत्नागिरी ग्राहक पेठेचे काम गेली १८ वर्षे सुरू आहे. Exhibition by Ratnagiri Consumer Centre
अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या प्रदर्शनात महिलांसाठी आरोग्यविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धा, फनी गेम्सचे आयोजन केले आहे. महिलांच्या मानसिक, शारीरिक विचार करून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महिलांचे चार दिवस मजेत जावेत आणि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्रीही व्हावी या हेतूने हे प्रदर्शन फायदेशीर ठरणार आहे. यातील विविध उपक्रमांचे आयोजन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे करण्यात आले आहे. Exhibition by Ratnagiri Consumer Centre
