• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका भजनी मंडळांची कार्यकारीणी जाहीर

by Ganesh Dhanawade
June 13, 2025
in Guhagar
230 2
0
Executive of Guhagar Taluka Bhajani Mandals
452
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील भजनी मंडळांनी एकत्र येत अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेची गुहागर तालुका शाखा स्थापन केली आहे. या तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी गुहागरचे सागर मोरे यांची, उपाध्यक्षपदी शिवणे येथील संतोष पांचाळ, सचिव पदी गुहागरचे पखवाजवादक संदेश हुमणे आणि खजिनदार पदी गुहागरच्याच अभय साटले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. Executive of Guhagar Taluka Bhajani Mandals

Minor girl kidnapped from Ratnagiri

गुहागर तालुक्यातील भजन मंडळांच्या कलाकारांना शासकीय योजनांचा फायदा मिळावा. भजन या कलेला राजाश्रय मिळावा. यासाठी गुहागर तालुक्यातील भजन मंडळांनी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला. या संस्थेच्या करण्यात आले आहे.  मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गुहागर तालुका भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ या शाखेची स्थापना करण्यात आली.  नव्याने स्थापन झालेल्या भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाची पहिली कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारीणीमध्ये सदस्य म्हणून संदिप शिरधनकर,गुहागर बाग, महेंद्र वराडकर गुहागर, सचिन जाधव नरवण, सुधाकर पिलवलकर निगुंडळ, जयराम ठाकूर कोंड कारुळ, अरुण बागकर गुहागर बाग, विनायक जोशी गुहागर, प्रदिप साटले गुहागर, सुहास चव्हाण पालशेत, शैलेश शेटे गुहागर, परेश देवकर आरे, आदेश मोरे गुहागर, सतिष मोरे वेळणेश्वर, उमेश शिंदे वेळणेश्वर आणि उमेश गोयथळे गुहागर यांची निवड करण्यात आली. तर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. मयुरेश पावसकर यांची निवड करण्यात आली आहे. Executive of Guhagar Taluka Bhajani Mandals

अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेची रत्नागिरी जिल्हा शाखा देखील स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा शाखेच्या कार्यकारीणीसाठी प्रत्येक तालुका शाखेने आपले काही सदस्य द्यायचे आहेत. गुहागर शाखेने आज झालेल्या सभेमध्ये जिल्हा कार्यकारीणीतील प्रतिनिधी म्हणून पालशेतचे प्रसिध्द भजनी बुधा महेश होळंब, कोंडकारुळचे प्रसिध्द बुवा संदेश पोळेकर यांची निवड केली आहे. तसेच विभाग कार्यकारीणीसाठी पालशेतमधील मिनार पाटील व नरवण मधील मंदार जाधव यांची निवड करण्यात आली आहे. Executive of Guhagar Taluka Bhajani Mandals

या सभेचा समारोप करताना गुहागर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष सागर मोरे यांनी आवाहन केले आहे की, गुहागर तालुक्यातील अजुनही ज्या भजन मंडळांनी गुहागर शाखेकडे नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर गुहागर कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि आपल्या मंडळातील सर्वांची नोंदणी करुन घ्यावी. Executive of Guhagar Taluka Bhajani Mandals

Tags: Executive of Guhagar Taluka Bhajani MandalsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share181SendTweet113
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.