संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यात आपत्ती काळात उत्कृष्ट नियोजन करून गुहागर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे गुहागर तालुक्याचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना महसूल दिनात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. “Excellent Tehsildar Award” to Parikshit Patil

गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्याबद्दल आबलोली गावचे सामाजिक कार्यकर्ते व ऍड. प्रमेय आर्यमाने, उद्योजक ओंकार बाईत यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गुहागर तालुक्यातील जनतेकडून तहसीलदार परीक्षित पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. “Excellent Tehsildar Award” to Parikshit Patil