निवेदन कौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधले
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील तळवली गावची सध्या मुंबईत राहत असलेली सुकन्या कु. पारमी दीपाली रविंद्र पवार ही अल्पवयातच उल्लेखनीय निवेदिका म्हणून नावारूपास आली आहे. सध्या इयत्ता ८वीत शिक्षण घेणाऱ्या पारमीने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या 18 जुलै 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई, येथे “भीमा तुम्हा वंदना” या कार्यक्रमात अतिशय मधाळवाणीने प्रभावी, सुवाच्य निवेदन सादर करून रसिकांची मने जिंकली, तिच्या या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Excellent presenter Parami Pawar
कु. पारमी हिने तिच्या निवेदनकलेचे संपूर्ण श्रेय तिच्या वडिलांना म्हणजे रविंद्र पवार यांना दिले. पारमीचे वडील रविंद्र अनंत पवार यांनी २००० ते २००२ या कालावधीत गुहागर व चिपळूण परिसरातील शाळा, महाविद्यालये व सेवाभावी संस्थांमध्ये, सामाजिक संघटना, हॉस्पिटल येथे स्मरणशक्ती विकास व व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या विषयांवर तब्बल ८० विनामूल्य व्याख्याने दिली होती. रविंद्र अनंत पवार यांनी केलेल्या मराठी मालिका वहिनीसाहेब, इंद्रधनुष्य,पारिजात, देवयानी, जयोस्तुते, तुमचं आमचं सेम असतं, चाहूल, राधा प्रेम रंगी रंगली, कुंकू टिकली, लागिर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, घरोघरी मातीच्या चुली, ठरलं तर मग आणि सध्या ते झी टीव्हीवरील ‘शिवा’ मालिकेचे निर्मिती प्रबंधक म्हणून काम पाहत आहेत. गुहागर तालुका कला मंच चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र अनंत पवार यांची सुकन्या आहे. Excellent presenter Parami Pawar

कु. पारमी पवार वयाच्या चौथ्या वर्षापासूनच(17 एप्रिल 2017) वडिलांच्या कार्यक्रमांतून निवेदिका म्हणून निवेदन करण्यास सुरुवात करून, शाळेत. सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना तसेच सम्यक कला मंच तळवली विविध ठिकाणी संचालिका आणि निवेदिका म्हणून करत असते. पुढे जाऊन “हसत खेळत प्रबोधन करूया” व “आपणच होम मिनिस्टर होऊया” यांसारख्या महिलांसाठी आयोजित कार्यक्रमांमध्येही ती सुरुवात निवेदिका करत असते तिचे निवेदन कौशल्य दिवसेंदिवस प्रगल्भ होत आहे. येणाऱ्या 20 ऑगस्ट सायंकाळी 7:00 वाजता छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे या ठिकाणी, दि निर्मिक क्रेडिट सोसायटी यांच्या सहकार्याने आणि आर्क इव्हेंट या उच्च मॅनेजमेंट कंपनी द्वारे होणाऱ्या सृष्टी फाउंडेशन निर्मित ऑर्केस्ट्रा द रायझिंग यंग स्टार मध्ये आयोजित हिंदी-मराठी गाण्याच्या कार्यक्रमात पारमी निवेदिका म्हणून पुन्हा एकदा आपली चमक दाखवणार आहे. Excellent presenter Parami Pawar
कु. पारमी पवार ही जरी बालवयात असली तरी तिच्या भाषिक अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि निवेदनशैलीमुळे ती एक उदयोन्मुख सूत्रसंचालिका म्हणून निश्चितच आश्वासक वाटते. तिच्या पुढील वाटचालीसाठी तळवली ग्रामस्थ, नातेवाईक, तिचे शिक्षकवृंद व अनेक मान्यवरांनी तिला शुभेच्छा देत तिच्यावर शुभेच्छांचा खुप वर्षाव केला जात आहे. Excellent presenter Parami Pawar