चिपळूण तालुका अध्यक्ष पदी राजू महाजन तर सचिव पदी रणविर सावंत यांची निवड
गुहागर, दि.11 : चिपळूण तालुक्यातील गणपती मूर्तिकार यांना संघटित करण्याच्या उद्देशाने व त्यांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावं. या उद्देशाने गणपती मूर्तिकार संघटनेची स्थापना व्हावी. यासाठी दिनांक 8 मार्च 2022 रोजी श्री. राजन शेठ लवेकर यांच्या पुढाकाराने सावरकर सभागृह चिपळून नगर परिषद समोर सभा संपन्न झाली. या सभेसाठी जिल्हा कार्यकारणी चे अध्यक्ष माननीय श्री बोरसुतकर गुरुजी जिल्हा कार्यकारणी चे उपाध्यक्ष माननीय श्री राजन शेठ लवेकर, सदस्य खानविलकर व जाधव, तसेच तालुक्यातील गणपती मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. Establishment of a sculptor’s team


या सभेमध्ये तालुका कार्यकारणी निवड प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री राजू शेठ महाजन, उपाध्यक्ष श्री. उमेश प्रभाकर महाडिक व श्री. शांताराम राजाराम सावंत, सचिव श्री. रणवीर अशोक सावंत, सहसचिव श्री. सुनील विठ्ठल बांदेकर, खजिनदार श्री विजय विष्णू सागवेकर सदस्य म्हणून श्री. राकेश शांताराम कदम, श्री शेखर अशोक मिस्त्री, श्री गुरुराज परशुराम शिंदे, श्री किशोर रघुनाथ पालशेतकर, श्री. स्वप्नील सिताराम साळवी, श्री. विलास वासुदेव धामणस्कर, श्री. कौस्तुभ विलास सूर्वे, श्री. वसंत शशिकांत महाडिक, यांची निवड करण्यात आली. Establishment of a sculptor’s team
अध्यक्षीय भाषणात श्री राजू शेठ महाजन यांनी या संघटने विषयी बोलताना मूर्तिकारांच्या न्याय व हक्कासाठी सदैव या संघटनेच्या माध्यमातून आपण काम करू अशी ग्वाही दिली. चिपळून व आजूबाजूच्या गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर गणपती मूर्तिकारांचे नुकसान झालेले दिसून आले. यासाठी शासनाकडून योग्य मदत मूर्तिकारां पर्यंत पोचवण्यासाठी आमदार माननीय श्री. शेखरजी निकम साहेब व माजी आमदार श्री रमेशभाई कदम तसेच चिपळूण नगरपरिषद यांनी मोलाचे सहकार्य केले होते. त्यांचे आभार यानिमित्ताने सर्वांनी मानले. Establishment of a sculptor’s team
सभेला उपस्थित असलेले जिल्हा कार्यकारणी चे अध्यक्ष श्री.बोरसुतकर गुरुजी यांनी निवड झालेल्या तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Establishment of a sculptor’s team

