खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे आयोजन; 103 शोधनिबंध, लेखांचे सादरीकरण
गुहागर, दि. 28 : खरे ढेरे भोसले महाविद्यालय (Khare, Dhere, Bhosle College) गुहागरमध्ये दि. मंगळवार 15 फेब्रुवारी २०२२ रोजी एकदिवशीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय ऑनलाइन परिषदेचे Sosio-Economic Impacts of the Climate change with Referance to Indian Subcontinent” या विषयावर आयोजन करण्यात आले होते. ह्या राष्ट्रीय ऑनलाइन परिषदेला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. Environmental National Conference Done

राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर सुधीर पुराणिक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर ती राष्ट्रीय ऑनलाइन परिषद निश्चित महत्त्वाचे चिंतन मनन करेल असा आशावाद व्यक्त केला. तसेच सध्या बदलत्या जागतिक हवामानाचा अभ्यास करणे काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले. Environmental National Conference Done
देश पातळीवर घेण्यात आलेल्या या परिषदेमध्ये ६ पेक्षा अधिक राज्यांमधून (उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आसाम उत्तराखंड तामिळनाडू) अनेक व्यक्तींनी आपला सहभाग नोंदविला. 172 पेक्षा अधिक व्यक्ती ऑनलाइन परिषदेला उपस्थित होत्या. पर्यावरणीय बदल व त्याचे सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम या विषयावर परिषदेदरम्यान 103 शोधनिबंध, लेख यांचे सादरीकरण करण्यात आले. गुहागर सारख्या ग्रामीण निमशहरी भागांमध्ये खरे भोसले महाविद्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तसेच ही राष्ट्रीय परिषद यशस्वी व्हावी यासाठी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे महाविद्यालयाचे सर्वांतर्फे कौतुक करण्यात येत आहे. Environmental National Conference Done
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक परिषदेचे समन्वयक डॉ. आनंद कांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यात महाविद्यालय राबवीत असलेल्या या उपक्रमाला “Grand Success” प्राप्त होईल, असे अनेक उपक्रम आम्ही राबविण्याच्या विचारात आहोत असे मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांचे स्वागत केले प्रमुख व्याख्यात्या मा. डॉ. प्रियदर्शिनी कर्वे पुणे यांनी पर्यावरणीय बदलाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम सांगितले. पर्यावरणीय बदलाची मूलभूत चिकित्सा केली. Environmental National Conference Done

व्याख्याते मा. डॉ.पी.एस. कांबळे प्रोफेसर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी सोदाहरनात्मक पर्यावरणीय बदलाचे विश्लेषण केले. त्यांचे विवेचन मार्मिक व चिकित्सक होते. पुढील व्याख्याते मा. डॉ. धृवसेन सिंग, लखनऊ उत्तर प्रदेश The Director, UGC-HRDC, University of Luchnow यांनी हवा, पाणी, उष्णता तसेच मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणामध्ये घडत असलेल्या बदलांबाबत मार्गदर्शन केले. यानंतरच्या सत्रामध्ये व्याख्याते मा. डॉ. शिवाजी चव्हाण डायरेक्टर- प्रोफेसर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी आपल्या स्पष्टीकरणात अंटार्टिका खंडावर हवामान बदलाचे परिणाम व याबाबत भारत देशाच्या वैज्ञानिकांकडून करण्यात येणाऱ्या नव्या संशोधन प्रकल्पांची ओळख व माहिती उपस्थितांना दिली. Environmental National Conference Done

त्यानंतर तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात भारतभरातून प्राप्त झालेल्या संशोधित शोध निबंधात पैकी मोजक्या शोध निबंधाच्या सादरीकरणाचे सत्र नियोजनरित्या पार पडले. यात संशोधिका पश्चिम बंगालचे डॉ. देव घोष, तामिळनाडूच्या डॉ. हेमामालिनी, महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर वायाळ, आसामच्या डॉ. मोनिका तसेच रश्मी सुधाकुमार आणि इतर संशोधकांचे शोधनिबंध सादर झाले. Environmental National Conference Done

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य डॉक्टर अतुल साळुंके यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केली त्यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण रक्षणासाठी व संवर्धनासाठी “वासुदेव कुटुंबकम” ही वृत्ती जोपासण्याची गरज आहे आणि त्यात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची आहे असे मत व्यक्त केले. Environmental National Conference Done

सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. महेश जी. भोसले साहेब उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी साहेब व सर्व संचालक मंडळ आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. श्री. तानाजीराव चोरगे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पर्यावरणीय बदलांच्या दृष्टीने कोकण किनारपट्टी अतिशय संवेदनशील मानली जाते आपल्या पर्यावरणात होत चाललेल्या बदलांना समजून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करणं हे येणाऱ्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आपण पर्यावरणीय बदलांमुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाऊ शकू. समारोप कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. डॉ. अनिल सावंत यांनी आपले विचार व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. Environmental National Conference Done
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर सोळंके आणि आभार प्रदर्शन प्रा. नीळकंठ भालेराव यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन Zoom app वर आभासी पद्धतीने करण्यात आले होते. Environmental National Conference Done

