बालभारती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, शृंगारतळीत सादरीकरण
गुहागर, दि. 24 : ‘झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा’ या विषयांतर्गत अंजनवेल येथील बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शृंगारतळी मालाणी मार्टसमोर पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी जनतेत पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण केली. उपस्थित प्रेक्षकांनी विदयार्थ्यांना प्रोत्साहन देवून त्यांचे कौतुक केले. Environmental awareness through street plays

या पथनाट्यातून ‘झाडे वाचवून निसर्गाचे संगोपन करा’ हा संदेश देण्याचाही प्रयत्न केला. तसेच या पथनाट्याला आरजीपीपीएलचे ए. के. सामंता, आरजीपीपीएलचे एचआर डीजीएम जॉन फिलिप्स, तहसिलदार प्रतिभा वराळे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. Environmental awareness through street plays
या कार्यक्रमासाठी पाटपन्हाळे ग्रामपंचायत, गुहागर पोलीस, मालाणी मार्टचे मालक नदीम मालाणी, पालक, मुख्याध्यापक सुरजित चटर्जी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Environmental awareness through street plays

