वेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरा
गुहागर, ता. 28 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करून प्रथम दिवस म्हणून उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. Environmental Awareness and Hygiene Week

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदई गावचे सरपंच मा. चैतन्य धोपावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण, वृक्षारोपणाचे महत्व आवश्यकता गरज याविषयी मार्गदर्शन करून प्रथम दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री केतन कुंडिया यांनी पर्यावरण जनजागृती विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदर सप्ताह अंतर्गत वेळणेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेळणेश्वर नं. १, वेळणेश्वर मंदिर परिसर येथून समुद्रकिनाऱ्यापर्यंत पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. व शेवटी समुद्र किनारी स्वच्छता करण्यात आली. Environmental Awareness and Hygiene Week

समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्री. चैतन्य धोपावकर यांनी आपल्या मनोगतात सात दिवस विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. डॉ. अमितकुमार माने यांनी पर्यावरण जनजागृती व स्वच्छतेच्या बाबतीत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण सरगर, प्रा. केशव चौगुले प्रा. निखिल पांढरपट्टे प्रा. औदुंबर पाटकर प्रा. श्रुती मुंडे, प्रा. वैभवी मेथा व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. Environmental Awareness and Hygiene Week

