गुहागर, ता. 05 : धोपावे गावांतर्गत रस्त्याला जनसुविधा योजनेतून पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी मिळवून दिला. त्यामुळे धोपावे येथील मच्छीमार समाजाच्या पाटीलवाडी, जाधववाडी , गुढेकरवाडी, विघ्नहर्तावाडी गणेशनगर, बौध्दवाडी व तेलीवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते चिपळुणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्यासह युवा जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई उपस्थित होते. Entry of Dhopave villagers into Shiv Sena
रानवी धोपावे मार्गावरील राजन दळी यांचे ते मच्छीमार समाजाच्या वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावरील नवीन पुल या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण व्हावे, अशी मच्छीमार समाजाची मागणी होती. ही मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख नरेश पवार यांच्या माध्यमातून तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्याकडे आली. याबाबत दिपक कनगुटकर यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्र पाठवले. तातडीने कार्यवाही करत मंत्री सामंत यांनी जनसुविधा योजने या कामाचा समावेश केला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे. Entry of Dhopave villagers into Shiv Sena


अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने धोपावे मधील मच्छीमार समाजाच्या पाटीलवाडी, जाधववाडी , गुढेकरवाडी, विघ्नहर्ता वाडी तसेच बौध्दवाडी तेलीवाडीतील काही ग्रामस्थ अशा शेकडो ग्रामस्थांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रातिनिधीक स्वरुपात कैलास पवार, भिकाजी संसारे, जयराज भोसले, रविंद्र पाटील, रामदास संसारे, सौ. सुनिता जाधव, भाग्यश्री संसारे, प्रणाली जाधव, रणांगणी पाटील, विनंती संसारे आदीं कार्यकर्त्यांचे शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण व युवा जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी शिवसेनेचा पट्टा घालुन स्वागत केले. Entry of Dhopave villagers into Shiv Sena
यावेळी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी धोपावेतून खाडीला मिळणाऱ्या नदीचा गाळ उपसल्यास आमच्या पारंपरिक नौका गावापर्यंत येतील. त्यामुळे या नदीचा खोली वाढवावी, दाभोळ खाडी किनाऱ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, रानवी ते धोपावे मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, धोपावे गावासाठी कायम स्वरुपी पाणी असणारी विहीर बांधणे इत्यादी कामांच्या मागणीचे निवेदन दिले. Entry of Dhopave villagers into Shiv Sena


पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना सदानंद चव्हाण म्हणाले की, आपण जनतेची सेवा करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा आम्ही करु. तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांनी धोपावेच्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरविण्यासाठी नळपाणी योजना राबविण्यास आमचे सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के यांनी मार्गर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाखाप्रमुख रोहिदास जाधव यांनी केले. तर सचिव संतोष आग्रे यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली. Entry of Dhopave villagers into Shiv Sena
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुका सचिव संतोष आग्रे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, महिला तालुका प्रमुख सौ. सुप्रिया चव्हाण, तालुका युवा प्रमुख रोहन भोसले, युवा तालुका सचिव अमरदिप परचुरे, ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे, उपतालुका प्रमुख राजेश धामणस्कर व महेश जामसुतकर, विभागप्रमुख संदिप भोसले, उपविभागप्रमुख नरेश पवार, युवा शहर संघटक राकेश साखरकर, युवा शहर उपप्रमुख अमोल गोयथळे, उपविभागप्रमुख नरेश पवार व उमेश किल्लेकर, शाखाप्रमुख रोहीदास जाधव, दत्ता जांगळी, मनिष मोरे, संदेश कचरेकर, उपशाखा प्रमुख भिकाजी संसारे, शिवदुत प्रफुल जाधव व दिपक शिरगावकर, नवनाथ कुरधुंडकर , महेश शितप सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. Entry of Dhopave villagers into Shiv Sena