‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला उत्फुर्त प्रतिसाद
नरेश मोरे, गुहागर
शनिवारी दि. १५ ऑक्टोबर २०२२ मुंबईत विलेपार्ले येथे नवोदित लेखक, दिग्दर्शक कृष्णा येद्रे-पाटील यांच्या झुंजार प्रोडक्शन च्या ‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला जाण्याचा योग आला. नवोदित कलाकारांनी मिळून एक उत्तम कलाकृती सादर केली. या नाटकातून संघर्ष, प्रबोधन आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा कशी फोडावी ही मांडणी करण्यात आली आहे. आपल्या मनातील विषयाला न्याय देण्याचा हा प्रयत्न आहे. नवोदित सर्वच कलाकार यांनी अभिनयात जीव ओतून अभिनय केला. प्रत्येकाची मेहनत दिसून येत होती. लेखन दिग्दर्शन उत्तमरित्या झाले आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत सर्वच बाजू उत्तम आहेत. मनोरंजनातून हलके फुलके प्रबोधन करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. Enthusiastic response to the play ‘Ladha’


आगळंवेगळे काहीतरी करण्याची नवी उमीद मनी ठेवून, रंगभूमीवर वावरणारे कोकण सुपुत्र श्री.कृष्णा येद्रे यांची गरूडझेप आज कौतुकास्पद ठरत आहे. समाजातील नवोदित लेखन आपल्या कलाकृतीतून समाजिक प्रबोधन करीत आहेत. हे नाटक समाज व्यवस्था, गावातील राजकारण आणि सामान्य माणूस त्याने निर्माण केलेला संघर्ष यातून दिसून येतो. झुंझार च्या संपूर्ण टीम चे गोड कौतुक, असेच सातत्य ठेवावे. विनोदी भूमिका साकारणारे अनंत ठीक आणि सहकारी यांचा अभिनय फारच उत्तम होता. लोककलेतून, मनोरंजनातून अशीच लोकांचे प्रबोधन करीत राहावे. आपला सुद्धा युवा एक दर्जेदार लेखन करतोय याचा सार्थ अभिमान आहे. सर्वच कलाकारांनी अगदी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन ..! Enthusiastic response to the play ‘Ladha’


समाजात या नाटकाचे अनेक प्रयोग यशस्वी झाले पाहिजे. असे कुणबी युवा मंडळ (मुंबई)अध्यक्ष श्री. माधवजी कांबळे साहेब यांनी सांगितले आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तरी नाट्य प्रयोग साठी श्री.कृष्णा येद्रे- 9773142819 यांच्याशी संपर्क करा. Enthusiastic response to the play ‘Ladha’