आमदार भास्कर जाधव : फक्त मराठी माणसांच्या पाठी चौकशीचा ससेमिरा
गुहागर, दि.14 : आज देशात सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांना संपविण्याचे कारस्थान भाजपकडून (BJP) सुरु आहे. महाराष्ट्रात तर फक्त मराठी माणसांच्या पाठी चौकशीचा ससेमिरा लावला जातोय. भाजपचा हा हैदोस संपवायचे काम फक्त शिवसैनिकच करु शकतो. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे भाजपचे गावागावातील राजकीय अस्तित्व संपवा. असे आवाहन आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी केले. End BJP’s Political Presence in Villages
पालपेणे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव (Z. P. President Vikrant Jadhav) यांच्या कार्यअहवाल पुस्तिका प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला. ते म्हणाले की, भाजप (BJP) नेत्यांवर टिका केली की ईडी, सीबीआय आदी चौकश्यांचा ससेमिरा लावला जातो. मात्र त्यांना एखादी नोटीस पाठवली की आम्ही सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप होतो. गेल्या 28 वर्षांच्या राजकारणात मी कधी ईडीचा शब्द ऐकायला नव्हता. पण आज सातत्याने देशात हे शब्द ऐकायला येतात. महाराष्ट्रात प्रताप सरनाईक, संजय राऊत, अजित पवार, हसन मुश्रीप, अविनाश भोसले, अनिल परब, अनिल देशमुख आदी सर्व मराठी माणसांमागे चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. मराठी माणूस सोडून अन्य कोणी वेडवाकडं वागतच नाही का? End BJP’s Political Presence in Villages
नबाब मलिकांना जेल मध्ये टाकून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतयं. दाऊदशी संबध लावला जातोय. हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न होतोय. नवाब मलिकांच्या वडिलांनी भंगारासाठी 1973 मध्ये जमीन घेतली होती. तेव्हा दाऊद उदयाला आला नव्हता. त्यांचा व्यवहार 2003 मध्ये नवाब मलिक यांनी पूर्ण केला. बॉम्बस्फोट 1993 मध्ये झाले. त्या केसमध्ये कुठेही संशयित म्हणूनही नवाब मलिकांचे नाव नव्हते. तरी देखील गेले 8 महिने मलिक भाजप (BJP) नेत्यांविरुद्ध बोलत असल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ज्या घटनांमध्ये 20-20 वर्षांचे अंतर आहे त्यांचा दाऊदशी संबध जोडून 2022 मध्ये त्यांना अटक केली जात आहे. End BJP’s Political Presence in Villages
महाराष्ट्रातील नेत्यांच्या पाठी शुक्लकाष्ठ लावण्याचे काम केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. अशाप्रकारे हैदोस घालणाऱ्या भाजपचे (BJP) गावागावातील राजकीय अस्तित्व संपविण्याचे काम आपल्याला करावे लागेल. त्यांची दादागिरी मोडून काढण्याचे काम शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिकांनच करु शकतो. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप संपविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करुया. End BJP’s Political Presence in Villages