• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एस.टी.च्या खाली चिरडून वृद्धेचा मृत्यू

by Ganesh Dhanawade
February 2, 2023
in Guhagar
909 9
0
Elderly dies under ST

Elderly dies under ST

1.8k
SHARES
5.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवानगरमधील घटना,  कंबर आणि पाठीवरुन गेली एस.टी.

गुहागर, ता. 02 :  तालुक्यातील नवानगर मोहल्ला बसथांब्याजवळ सकाळी 10.30 च्या दरम्यान एका वृद्ध महिलेल्या अंगावरुन एस.टी. गेली. या अपघातात 65 वर्षीय वृद्धा जागीच ठार झाली. या घटनेत पोलीसांनी एस.टी.चालकावर गुन्हा दाखल केला आहे. Elderly dies under ST

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

Elderly dies under ST

गुरुवारी (ता. 2) गुहागर आगारातून सुटणारी गुहागर धोपावे मार्गे वेलदूर ही एस.टी. (एमएच 14 बीटी 2970) नवानगर मोहल्ला येथे सकाळी 10.30 च्या सुमारास आली. सदर एस.टी. चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ रा. चिखली कदमवाडी वय 54 हे चालवित होते. या एस.टी.वर विजय विठ्ठल पवार रा. शृंगारतळी वय 33 हे वाहक होते. नवानगर मोहल्ला थांब्यावर एसटीतील काही प्रवासी उतरले. वेलदूर, गुहागरला जाणारे प्रवासी गाडीत बसले. त्यानंतर एस.टी. सुरु झाली. बस ‌थांब्यापासून एस.टी. सुमारे 10 ते 15 मीटर इतकीच पुढे आली. इतक्यात नवानगर गावातून येणाऱ्या छोट्या पायवाटेवरुन मालती विठू रोहीलकर (वय 65, रा. नवानगर) ही महिला रस्त्यावर आली. प्रवाशांची चढ उतार करुन निघालेल्या एस.टी.चालकाला अचानक समोर आलेली महिला दिसलीच नाही. त्यामुळे एस.टी.ची धडक महिलेला बसली व महिला एस.टी. खाली पडली. दुर्दैवाने एस.टी.ची मागची चाके मालतीच्या कंबर व पाठीवर गेली आणि जागीच मालती रोहीलकरचा मृत्यू झाला. Elderly dies under ST

नवानगरला मालती रोहीलकर या आपल्या सुनेबरोबर रहातात. त्यांचा मुलगा मुंबईमध्ये बोटीवर कामाला आहे. तर मुलगी पालशेतला सासरी रहाते. गुरुवारी सायंकाळी चिखलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मालती रोहीलकर यांचा मृतदेह नवानगर ग्रामस्थांनी ताब्यात घेतला. Elderly dies under ST

मालती रोहीलकर या चुकणारी एस.टी. थांबविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध आल्या की त्या रस्ता ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या हे मात्र कळलेले नाही. एस.टी.च्या चाकाखाली जावून महिला ठार झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी गुहागर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लुकमान तडवी पोचले. पोलीसांनी एस.टी. चालक चंद्रकांत सकपाळ यांच्यावर भा.द.वी. कलम 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Elderly dies under ST

नगरसेवक समीर घाणेकर यांची तत्परता

दरम्यान मालती रोहीलकरचा मृतदेह चिखली आरोग्य केंद्रात नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था होत नव्हती. एस.टी. महामंडळाने गुहागर नगरपंचायतीकडे वैकुंठ रथाची मागणी केली. मात्र चालक अन्य कामासाठी गेल्याने वैकुंठ रथ अपघात स्थळी पोचण्यास दोन तासांचा अवधी लागणार होता. नगरसेवक समीर घाणेकर यांच्यापर्यंत ही माहिती पोचताच एस.टी.च्या गुहागर आगारातील चालकाकडे वैकुंठ रथ सोपवण्याची जुळणी घाणेकर यांनी केली. (ही बातमी तपशीलात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

Tags: Elderly dies under STGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share713SendTweet446
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.