लवकरच बाजारात आणणार; अंतिम मंजूरीची प्रतिक्षा
माँस्को, ता. 08 : रशियाने कॅन्सरच्या लढाईत एक नवीन यश मिळवले आहे. रशियातील फेडरल मेडिकल तसेच बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) FMBA ने कॅन्सर या दुर्धर आजारावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. FMBD प्रमुख वेरोनिका स्क्वोर्त्सोवा यांनी सांगितले की रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सीन आता वापरासाठी तयार आहे. mRNA-बेस्ड या व्हॅक्सीनमध्ये सर्व प्रकारच्या प्री-क्लीनिकल टेस्टना यशस्वीपणे पार केले आहे. त्यामुळे ही लस सुरक्षित आणि प्रभावशील सिद्ध झाल्याचे म्हटले जात आहे. या लसीचे प्रारंभीक लक्ष्य कोलोरेक्टल कॅन्सर ( कोलन कॅन्सर ) असणार आहे. Effective vaccine against cancer developed
ही लस खास MRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक आरएनए प्रोफाइलनुसार ती कस्टमाइज केली जाईल. म्हणजेच प्रत्येक रुग्णासाठी ही लस वैयक्तिक पातळीवर तयार केली जाणार आहे, ज्यामुळे त्याचा परिणाम अधिक प्रभावी होईल. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, ही लस ट्यूमरचा आकार ६०% ते ८०% पर्यंत कमी करण्यात यशस्वी ठरली आहे. एवढेच नव्हे तर ट्यूमरची वाढ मंदावण्यातही ती सक्षम ठरली आहे. हे निष्कर्ष कर्करोग संशोधन क्षेत्रासाठी ऐतिहासिक मानले जात आहेत. Effective vaccine against cancer developed

रशियाने तयार केलेल्या कॅन्सरच्या लसीने प्रीक्लिनिकल चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. आता ही लस वापरासाठी तयार आहे. ३ वर्षांपासून केलेल्या चाचण्यांमधून त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे. ही माहिती रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीच्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी दिली. ‘या लसीवर अनेक वर्षांपासून संशोधन केले जात आहे आणि त्याच्या प्रीक्लिनिकल चाचण्या ३ वर्षे घेण्यात आल्या आहेत’, अशी माहिती त्यांनी दिली. Effective vaccine against cancer developed
‘ही लस वापरासाठी तयार आहे, आम्ही अधिकृत मंजुरीची वाट पाहत आहोत. वारंवार वापरल्यानंतरही लसीचा परिणाम खूप चांगला होता. संशोधकांना ट्यूमरच्या आकारात 60% ते 80% घट दिसून आली. लसीचे प्रारंभिक लक्ष्य कोलोरेक्टल कर्करोग असेल. याशिवाय, ग्लिओब्लास्टोमा आणि विविध प्रकारच्या मेलेनोमासाठी लसी विकसित करण्यातही चांगली प्रगती झाली आहे, असंही वेरोनिकाने म्हणाल्या. रशियाने विकसित केलेली लस ही mRNA लस आहे. प्रत्येक रुग्णाच्या RNA नुसार ती उत्तेजित केली जाईल. जर लस मंजूर झाली तर केमोथेरपीची आवश्यकता राहणार नाही. ब्रिटिश सरकार जर्मनीच्या बायोएनटेकच्या सहकार्याने कर्करोगाची लस विकसित करत आहे. अमेरिकन औषध कंपन्या मॉडर्ना आणि मर्क देखील त्वचेच्या कर्करोगाशी लढण्यासाठी लस विकसित करत आहेत. Effective vaccine against cancer developed