रत्नागिरी, ता. 04 : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेमार्फत मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरीसराला शैक्षणिक भेट देण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. Educational visit of students of Dev, Ghaisas, Kir College
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरीसर येथे उत्साहपूर्ण वातावरणात ‘हवामान साक्षरता आणि शाश्वत जीवन: पर्यावरण विज्ञानातील करिअरचे प्रवेशद्वार’ या कार्यक्रमांतर्गत मनोरंजनात्मक रित्या पर्यावरणशास्त्र विषयांतर्गत विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली. यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांचे समान गट करून त्यांना विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता करण्यात आली. Educational visit of students of Dev, Ghaisas, Kir College

प्रास्ताविक प्रा. ऋजुदा जाधव यांनी केले. उपपरिसराच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या निसर्गातील दुर्मिळ वन्यप्राणी व वनस्पतींचे प्रदर्शन दाखवण्यात आले. त्यानंतर पर्यावरणाशी निगडित विविध उपक्रम घेण्यात आले. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पांडुरंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना रत्नागिरी उपपरिसरामध्ये चालणाऱ्या एम. एस्सी पर्यावरणशास्त्र या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. उपपरिसरातील सर्व प्रयोगशाळांना भेट देत विज्ञान शाखेमध्ये शिकताना आवश्यक असणाऱ्या विविध प्रयोगशाळा उपकरणांची माहिती देण्यात आली. रत्नागिरीतील वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेख केंद्रे या संशोधन प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली. Educational visit of students of Dev, Ghaisas, Kir College
याकरिता उपपरीसराचे प्रमुख डॉ. किशोर सुखटणकर, सहायक कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांचे सहकार्य लाभले. देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या प्रा. सानिका कीर आणि प्रा. आसावरी मयेकर आणि रत्नागिरी उपपरिसरातील सर्व प्राध्यापक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत चालणाऱ्या संशोधन प्रकल्पाचे कर्मचारी प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. Educational visit of students of Dev, Ghaisas, Kir College
