संस्थेतर्फे 3 हजार वह्यांचे मोफत वाटप
गुहागर, ता.15 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे नूकतेच सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून वह्या व शैक्षणिक साहित्य पुरविले अशा देणगीदार दात्यांचा संस्थेमार्फत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. Educational materials for the disabled
या शैक्षणिक वर्षात संस्थेतर्फे एकूण तीन हजार वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्याप वह्या मिळालेल्या नाहीत. त्यांनी दुपारी 2 ते 5 या वेळेत संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा, तालुका गुहागर येथे संपर्क साधावा. ज्या विद्यार्थ्यांना वह्यांची आवश्यकता आहे त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक सोबत घेऊन वरील वेळेत उपस्थित रहावे असे संस्थेमार्फत अध्यक्ष उदय रावणंग यांनी कळविले आहे. Educational materials for the disabled

गेली वीस वर्षे या संस्थेचा हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी, गरीब होतकरू विद्यार्थी, दिव्यांग पालक व संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. दिव्यांगांमध्ये शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने संस्थेतर्फे दरवर्षी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. Educational materials for the disabled
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार विनायक ओक, गुहागरचे शासकीय स्टॅम्प वेंडर हेमचंद्र मोरे, TWJ चे सामाजिक कार्यवाह प्रमुख रविदास कांबळे, श्री. विवेक कदम, सरचिटणीस श्री. सुनील रांजाणे, खजिनदार श्री. सुनील मुकनाक, संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत वह्यांचे व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. Educational materials for the disabled

अध्यक्षीय भाषणामध्ये सुधाकर कांबळे यांनी संस्था गेली वीस वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. या संस्थेचे उत्तम कार्य असून संस्थेतील अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी ही संस्था सतत नवनवीन उपक्रम राबवित आहे. नुकतेच संस्थेने सत्तावीस अपंगांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी या संस्थेच्या असणाऱ्या गरजा व समस्या सोडविण्यासाठी समाजातील लोकांनी पुढे आले पाहिजे. दिव्यांगांना सहानुभूती पेक्षा मदतीचा हात देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. Educational materials for the disabled
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री प्रकाश अनगुडे यांनी केले. समारोप सरचिटणीस श्री सुनील रांजाणे यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक श्री अनिल जोशी, सदस्य श्री संतोष घुमे, श्री भरत घेवडे, श्री संदेश धावडे, कुमारी कोमल शिंदे, कु. श्रवण रावणंग, कु. शंतनु रांजाणे व वसंत सलपे यांनी विशेष सहकार्य केले. Educational materials for the disabled
