गुहागर, ता. 02 : स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा खोडदे – निवाते वाडी येथील विद्यार्थ्यांना दिनांक 30 जून 2025 रोजी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन-पेन्सिल, वह्या, व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, आणि त्यांना शैक्षणिक प्रवासात आर्थिक अडचणी जाणवू नयेत, यासाठी प्रतिष्ठान दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवते. Educational materials distribution in Khodde school


या उपक्रमासाठी श्री.महेंद्र मोरे (समाजसेवक), विष्णू घाणेकर, संजय ठोंबरे, रवींद्र निवाते, विजय निवाते, पांडुरंग निवाते, प्रेम ठोंबरे, प्रतीक निवाते, प्रणव डिंगणकर, तुकाराम निवाते, मधुकर गोणबरे, मनस्वी मोरे, पूर्वा घाणेकर, पूजा निवाते, अपूर्वा निवाते, अवंतिका कावणकर, गीता निवाते, सुविधा गोणबरे, राजश्री साळवी (अंगणवाडी सेविका), सुनिता गोणबरे (मदतनीस), जयश्री संजय साळवी (अंगणवाडी सेविका), संचिता संदीप दनदणे (अंगणवाडी मदतनीस) यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडू शकला. Educational materials distribution in Khodde school


“विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची साधने – समाजाच्या सहकार्याने” असा या उपक्रमाचा मूळ हेतू असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतले, सल्लागार दत्ताराम डिंगणकर, व पदाधिकारी दिनेश झगडे, मितेश घडशी, रोहित सावंत, प्रेम खेतले, हेमंत खेतले, गणेश जाधव, राजू खेतले यांची उपस्थिती लाभली. Educational materials distribution in Khodde school