गुहागर, ता. 26 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असलेल्या सत्यम फाऊंडेशन जत जिल्हा सांगली या संस्थेतर्फे तसेच ए. सी. आय. वर्ल्डवाइल्ड या संस्थेच्या मदतीने केंद्रशाळा शीर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. Educational material to Sheer School by Satyam Foundation
यावेळी कोकण विभागामध्ये सत्यम फाउंडेशनला सहकार्य करणारे गुहागर येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. गोविंद सानप, प्रा. निळकंठ भालेराव, प्रा. संतोष जाधव, प्रा. अनिल हिरगोंड, केंद्रशाळा शीरचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक गुरव व शिक्षक सुहास गायकवाड, सौ. प्रमोदिनी गायकवाड, सौ. मृणाली रेडेकर, अजय खेराडे यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. Educational material to Sheer School by Satyam Foundation

ज्या उदात्त हेतूने सत्यम फाऊंडेशन व ए. सी. आय वर्ल्डवाईड ही संस्था करीत असलेले कार्य निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शी व प्रेरणादायी आहे. असे मत अध्यक्ष विनायक गुरव यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी सत्यम फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रतिवर्षी या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना जी मदत केली जाते त्याची जाण ही शाळा व संबंधित विद्यार्थी निश्चितच ठेवतील. अशी खात्री शाळेच्या वतीने दिली. तसेच शाळेच्या माध्यमातून सत्यम फाउंडेशनला जे काही सहकार्य आवश्यक आहे, ते सर्वोतपरी करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. शेवटी शिक्षक अजय खेराडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. Educational material to Sheer School by Satyam Foundation