गुहागर, ता. 13 : दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल येथे केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साह संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वती देवी व तात्यासाहेब नातू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ मनोज पाटील होते. Education Conference at Anjanvel High School
यावेळी अंजनवेल माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य गोरीवले, केंद्र मुख्याध्यापक निलेश खामकर, वेलदूर नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम नांदगावकर, घरटवाडी चे मुख्याध्यापक रमेश शिंदे, वेलदूर हायस्कूलचे दोलतोडे, अंजनवेल उर्दूचे बामणे, उर्दू हायस्कूलचे कुरेशी, रानवी शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब शिंदे, मार्गदर्शक सरगर सर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामले सर व महेश आंधळे सर यांनी केले. Education Conference at Anjanvel High School

केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांनी शिक्षण परिषदेच्या यशस्वी आयोजनाबाबत मुख्याध्यापक गोरिवले सर व शिक्षक वृंद यांना धन्यवाद दिले. डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान समृद्धी कार्यक्रम अंतर्गत सर्व, शिक्षकांनी खान अकॅडमी प्लॅटफॉर्म वापरून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता पूर्ण विकास साधावा, असे आवाहन केले. सरगर सर यांनी खान अकॅडमी प्लॅटफॉर्म वापराबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक विद्यार्थी यांनी खाते कसे तयार करावे तसेच एका वर्गातून दुसऱ्या वर्गात विद्यार्थी कसे जोडायचे, युनिट मास्टरी ध्येय कसे नियुक्त करायचे याबाबत प्रात्यक्षिकासह शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सविस्तर मार्गदर्शन केले. Education Conference at Anjanvel High School
डॉ. मनोज पाटील म्हणाले की, तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचे दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय हे गुहागर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. शिक्षण परिषद यशस्वी नियोजन केल्याबद्दल प्राचार्य गौरविले सर व सहकारी शिक्षक यांना त्यांनी धन्यवाद दिले. डॉ जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान समृद्धी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी कटिबद्ध राहावे असे त्यांनी आवाहन केले. Education Conference at Anjanvel High School