गुहागर, ता. 08 : निमंत्रित राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या कु. दुर्वांकूर देवघरकर याने सांघिक विजेते पदक पटकावून आपले व प्रशालेचे नाव गौरवित केले आहे. सदरच्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत 300 ते 350 मल्लखांब पट्टूंनी आपला सहभाग नोंदविला होता. 18 वर्षांवरील वयोगटामध्ये कु. दुर्वांकूर संतोष देवघरकर (इयत्ता 10वी ) याने प्रथम क्रमांकास गवसणी घातली. Durvankur wins team medal in Mallakhamb competition


कु. दुर्वांकूर हा विद्यार्थी सलग दोन वर्षे महाराष्ट्र सी.बी.एस.ई. संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. तो पहिली पासूनच मल्लखांब या खेळाचा सराव करत आहे. त्याने आपले खेळावरील कौशल्य दाखवत यापूर्वी घेण्यात आलेल्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांब स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने मिळविलेल्या यशामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. Durvankur wins team medal in Mallakhamb competition
कु. दुर्वांकूर याला मल्लखांब शिक्षक श्री. गौरव आंब्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. दुर्वांकूरचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Durvankur wins team medal in Mallakhamb competition